Rawer

ऐनपूर ग्रामपंचायत कार्यलयात भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देत जागतिक आदिवासी दिन साजरा

ऐनपूर ग्रामपंचायत कार्यलयात भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देत जागतिक आदिवासी दिन साजरा

प्रविण शेलोडे खिर्डी ता. रावेर

खिर्डी : खिर्डी येथून जवळच ऐनपूर येथे ग्रामपंचायत कार्यलयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला ऐनपूर ग्रामपंचायत सरपंच अमोल महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला
या बाबत सविस्तर वृत्त असे कि ऐनपूर ग्रामपंचायत कार्यलयात जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून बिरसा मुंडा याच्या प्रतिमेला माननीय सरपंच अमोल महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला, त्या वेळेस ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदले, ग्रामपंचायत सदस्य किशोरभाऊ पाटील, पंकजभाऊ पाटील, नजिर शेख, अनिलभाऊ जेतकर,
तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अरविंद महाजन, सामाजिक कार्यकर्ते आदिवासी एकता मंचचे ता अध्यक्ष प्रकाश भिल, अतुल पाटील, पंकज पाटील, नितीन जेतकर, सुनिल चव्हाण, राहुल महाजन, रविंद्र महाजन, पृथ्वीनाथ जेतकर, शरद अरसरमल तसेच अन्य आदीवासी बांधव व अन्य ग्रामस्त उपस्थित होते
आदिवासी एकता मंचचे ता अध्यक्ष प्रकाश भिल व कार्यकरत्यांनी बिरसा मुडा यांची प्रतिमा ऐनपूर ग्रामपंचायत कार्यलयात भेट दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button