Nashik

एम् अँड एम् इंडस्ट्रीज च्या वतीने शिक्षक दिन साजरा

एम् अँड एम् इंडस्ट्रीज च्या वतीने शिक्षक दिन साजरा

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

०५ सप्टेंबर, भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन एम् अँड एम् इंडस्ट्रीज तळेगाव येथे साजरा करण्यात आला.व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व असते, माणूस शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असताे आणि म्हणूनच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या मार्गदर्शक शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले गेले हाेते. प्रस्रुत प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव येथील रहिवासी असलेले आदर्श शिक्षक संताेष कथार सर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर कंपनीच्या वतीने विकास राऊत, राेहीत शेटे, पाैर्णिमा जाेर्वेकर यांनी शिक्षक दिनाचे अवचित्य साधून आपले मनाेगत मांडले.प्रमुख पाहुणे म्हणून बाेलतांना कथार सरांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंग आणि त्यातून चांगल्या लाेकांच्या संपर्कात राहील्याने सापडलेला मार्ग, वयाने लहान असलेल्यांकडूनही आपल्याला शिकता आलं पाहिजे हा आशावादी दृष्टीकोन उपस्थितांसमाेर आपल्या मनाेगताद्वारे मांडला.एम् अँड एम् इंडस्ट्रीज अशा विविधांगी विषयांवर कार्यक्रम सतत आयोजित करत असते.कर्मचारी वर्गाच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रबाेधनपर कार्यक्रम वेळोवेळी कंपनीत आयोजित केले जातात.तज्ञ लाेकांचे मार्गदर्शन अशा कार्यक्रमातून कर्मचारी वृदांना मिळावे हाच प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाचा असताे.प्रमुख पाहुण्यांना सत्कार स्वरुपात प्रेमाची भेट म्हणून एक राेपटे व एक भेटवस्तू देण्यात आली.पवन पाथरकर यांनी सुत्रसंचालन केले.एम् अँड एम् इंडस्ट्रीज चे संचालक मनाेहर शेटे सरांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button