Pandharpur

फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा

फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला:येथील फॅबटेक पॉलीटेक्नीक मध्ये महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय आदाटे यांनी दिली.या वेळी लोकशाही बळकट होण्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे आवश्यक असल्यामुळे नवीन पात्र मतदारांची नोंदणी होणे आवश्यक आहे व त्यासाठी विद्यार्थ्या मध्ये जागृकता निर्माण होण्यासाठी नोडल अधिकारी प्रा. श्री दत्तात्रय नरळे व पॉलिटेक्निक चे प्राचार्य शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयात आॉनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. रेवती सर्जे(Fy civil) , द्वितीय क्रमांक कु. धनश्री सावंत(Ty entc) व तृतीय क्रमांक कु. मोनाली राणे यांनी पटकावला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वैशाली मिस्कीन यांनी केले.यावेळी सर्व विभाग प्रमुख, विद्यार्थी प्रमुख पवनसुत पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button