Kolhapur

सामाजिक जाणिवेतून अमेय अग्रहारकर यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक जाणिवेतून अमेय अग्रहारकर यांचा वाढदिवस साजरा

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : अमेय अनिल अग्रहारकर यांच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त प्रतिक्षा बाळासाहेब कोळपे यांच्या वतीने शुभेच्छास्तव विविध सामाजिक उपक्रम राबविले लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला या मध्ये वड,पिंपळ, गुलमोहर, कडुनिंब अशा जास्त प्रमाणात ऑक्सीजन देणाऱ्या विविध औषधी व जंगली वृक्षांचे ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड ,जंगलाचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. आता कोरोणा काळात ऑक्सिजन बेड च्या कमतरतेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या देशाला बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची वेळ आली आहे. जर प्रतिक्षा कोळपे यांनी ज्या पद्धतीने अमेय अग्रहारकर यांचा वाढदिवस साजरा केला त्या पद्धतीने आपण सर्वांनी वाढदिवस व विविध कार्यक्रम ग्रीन फ़ाउंडेशन व अशा वृक्षरोपन व वृक्षसंवर्धन करणार्ऱ्या संस्थासोबत केले तर पुढच्या काळामध्ये भारताला ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही. असे प्रतिपादन ग्रीन फ़ाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी या वेळी केले.

ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था गेले पाच वर्ष वृक्षारोपण संवर्धन मोहीम राबवत आहे आज पर्यंत फाउंडेशन च्या वतीने बहुतांश झाडे लावण्यात आली .ग्रीन फाउंडेशन चे कार्य पारदर्शक आहे महिन्याचे चार आठवडे झाडांना पाणी घालणारी भारतातील पहीली संस्था असेल. या अनुषंगानेच ग्रीन फाउंडेशन यांना
युवा उद्योजक अमेय अनिल अग्रहारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिक्षा कोळपे यांच्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा येथील झाडांना ठिबक सिंचन साठी आर्थिक मदत ग्रीन फाउंडेशन ला देण्यात येणार आली. उन्हाळ्याचा वाढता कडका पहाता ग्रीन फाउंडेशन ला वाढदिवसानिमित्त मदत करण्यात आली .
ग्रीन फ़ाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अमेय अनिल अग्रहारकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button