Amalner

अमळनेर : 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतीदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करा ओबीसी विद्यार्थी पालक शिक्षक असोसिएशनचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतीदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करा

ओबीसी विद्यार्थी पालक शिक्षक असोसिएशनचे
गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी- 28 नोव्हेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी ओबीसी विद्यार्थी पालक-शिक्षक असोसिएशनच्या वतीने
गटशिक्षणाधिकारी आर. डी महाजन पंचायत समिती अमळनेर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिक्षक दिन हा चरित्र संपन्न व आदर्श शिक्षकांचे गुण असणाऱ्या व्यक्तींच्या नावाने साजरा केला पाहिजे. महात्मा फुलेच त्याग आणि बहुजनांच्या कल्याणासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. डॉ राधाकृष्णन यांच्या जन्माच्या चाळीस वर्षे अगोदर महात्मा फुले यांनी मुलींची शाळा पुण्यात सुरू केली. 19 ऑक्टोबर 1882 हंटर कमिशन समोर बहुजनांच्या मुलांना बारा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याची मागणी त्यांनी केली. म्हणून महात्मा फुले यांचा स्मृती दिन हाच शिक्षक दिवस म्हणून साजरा करावा. अशा आशयाचे आपण तालुकास्तरावर अध्यादेश काढून साजरा करण्याबाबत विनंती करावी अशी मागणी ओबीसी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, महिला जिल्हाध्यक्षा वसुंधरा लांडगे ,शहराध्यक्ष डी.ए सोनवणे, जिल्हा संघटक पी. एस. विंचूरकर, मनोहर पाटील , हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे,विज्ञान मंडळाचे समन्वयक निरंजन
,क्रीडा संघटनेचे आर.आर.सोनवणे,
उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे,सल्लागार
दशरथ लांडगे यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button