Maharashtra

सावधान..!जुने राजस्थान स्वीटमार्ट स्टेशन रोड येथून अन्न पदार्थ घेत आहात..!आरोग्याला होऊ शकतो धोका..!वाचा कारण…

सावधान..! जुने राजस्थान स्वीटमार्ट,स्टेशन रोड, येथून अन्न पदार्थ घेत आहात..!आरोग्याला होऊ शकतो धोका..!वाचा कारण…

अमळनेर येथील जुने राजस्थान स्वीट मार्ट मधून जर काही खाद्य पदार्थ घेत असाल तर आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. इथे मिळणारे पदार्थ सुरक्षित आहेत किंवा नाही याची कोणतीही खात्री नाही.कारण शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत येथे होते खाद्य पदार्थ विक्री..इथे वापरले जाणारे पदार्थ साहित्य,दूध पावडर,खवा इ आरोग्य पूर्ण आहे किंवा नाही.या पदार्थांचा शरीराला त्रास होऊ शकतो का हे निश्चित करण्यासाठी अन्न2व औषध मंत्रालयाने काही नियम अटी घालून दिल्या आहेत. त्यांचे पूर्ण पणे उल्लंघन करत हे स्वीट मार्ट सुरू आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी अशा उत्पादक, व्यापारी, रेस्टॉरंट्स, लहान eateries, किराणा दुकान, आयातदार, निर्यातदार, घरी आधारित अन्न व्यवसाय, डेअरी, प्रोसेसर, किरकोळ, ई-tailers सर्व अन्न संबंधित व्यवसाय आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी क्रमांक किंवा अन्न संकुल छापलेले किंवा आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.ह्या सर्वांना अन्न परवाना क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे .अन्न व्ययसाय करणाऱ्या प्रत्येक आस्थापनेस हा नियम बंधनकारक आहे. जर परवाना काढला असेल तर त्याचे नूतनीकरण करणे देखील तितकेच आवश्यक आहे.

यानुसार प्रत्येक उपहार गृह किंवा अन्न विक्रेता स ही नोंदणी करणे किंवा तिचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे असे असताना अमळनेर शहरातील असे काही उपहार गृह आहेत ज्यांनी ही नोंदणी केलेली नाही किंवा नोंदणीचे नूतनीकरण केलेले नाही.

यात प्रामुख्याने आज निदर्शनास आलेले उदा. म्हणजे जुने राजस्थान स्वीट मार्ट,पत्ता- साने गुरुजी शॉपिंग सेंटर,स्टेशन रोड, अमळनेर (मालाची पावती देताना चुकीची पावती दिली आहे,पावती सोबत देत आहे.)(वास्तवात दुकान वरील पत्त्यावर आहे.ज्या पिशवीत स्वीट दिले त्यावर वरील पत्ता आहे.)
सदर दुकानदाराकडे अन्न व औषध परवाना उपलब्ध नाही,किंवा नूतनीकरण केल्याचा कोणताही कागद दिला नाही, दाखविला नाही.अनेक वेळा विचारून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. एक ग्राहक म्हणून हा परवाना आहे किंवा नाही तो नुतनीकरण केला आहे किंवा नाही हे विचारण्याचा ग्राहकास पूर्ण अधिकार आहे. कारण जे अन्न पदार्थ त्यांच्या कडून ग्राहक विकत घेत आहे ते सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासून पाहणे जसे अन्न व औषध मंत्रालयाचे कार्य तसेच ग्राहकचाही अधिकार व हक्क असून सुज्ञ नागरिक जबाबदार देखील आहे.परंतु आज आलेल्या ह्या अनुभवावरून ह्या बाबतीत नागरिकांमध्ये अनभिज्ञता व प्रशासनाची अनास्था दिसून येत आहे.आपण पैसे देऊन जे अन्न विकत घेत आहोत ते पूर्ण पणे सुरक्षित आहे किंवा शासन प्रमाणित आहे किंवा नाही हे पाहणे त्याची चौकशी करणे ग्राहक म्हणून आपली जबाबदारी आणि हक्क आहे.

अमळनेर तालुक्यात ह्या विभागाचे कार्यालय उपलब्ध नाही.जळगाव येथून अनेक वेळा अधिकारी इथं पर्यंत पोहचू शकत नाही. अनेक तक्रारी ह्या तालुक्यात आहेत पण नागरिकांचे प्रबोधन करणे ह्या विषयी त्यांना त्यांचे अधिकार जर समजले तर अधिकाऱ्यांचे पर्यायाने प्रशासनाचे काम कमी होते. शासनाचा महसूल वाढतो.व्यापारी किंवा दुकनदारांकडून शासनाची फसवणूक होत नाही.कर बुडत नाही त्यामुळे ह्या सर्व विषयांच्या अनुषंगाने वरील दुकानाची चौकशी करण्यात येऊन सदर दुकानावर कार्यवाही करण्यात यावी.नोंदणी नसेल तर ती करून घ्यावी,नूतनीकरण करून घ्यावे.तसेच तालुक्यातील इतर दुकानाची देखील चौकशी करून त्यांची दुकाने कधी पासून अस्तित्वात आहेत? त्या दिवसापासून त्यांनी अन्न व औषध मंत्रालयाचा परवाना घेतला आहे का? घेतला आहे तर त्याचे नूतनीकरण केले आहे का? जर परवाना घेतलाच नाही आहे तर ही शासनाची फसवणूक असून संबंधितांवर मागील बुडविलेल्या करासह वसुली का होऊ नये? सदर व्यक्तींवर शासनास फसविल्या प्रकरणी गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

या संदर्भात अजून एक धक्कादायक माहिती समजली असून त्या प्रमाणे अन्न व औषध विभाग जळगाव यांच्या कडून प्रत्यक्ष पाहणी,निरीक्षण, प्रात्याक्षिक न करताच परवाने व नूतनीकरण दिले जाते.अर्थात ह्या संदर्भात मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच अन्न व औषध विभाग यांच्या कडे इमेल द्वारे तक्रार दाखल केली असून लवकरच या संदर्भात खुलासा होईलच..

तसेच अनेक दुकानांमध्ये आणि ह्या दुकानात देखील दुकाने व निरीक्षक नियमांचे देखील पूर्ण पणे उल्लंघन केले आहे.ह्या दुकानात फलक नाही ज्यात सुट्टीचा वार,किती कर्मचारी कार्यरत आहेत त्यांची नोंद नाही ,रोज पगार दिला जातो वै फलक नसल्याने स्पष्ट होत नाही. सदर दुकानाची कोरोना काळातही वारंवार नियमांचे उल्लंघन केले असून काही वेळा अमळनेर नगरपरिषदेने कार्यवाही केली आहे. त्याची माहिती व पुरावे आपणास अमळनेर न प त उपलब्ध होवू शकतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button