Pandharpur

नवजीवन हॉस्पिटल पंढरपूर मध्ये रविवार पासून आपल्या सेवेत कॅथ लॅब वैद्यकीय सेवा

नवजीवन हॉस्पिटल पंढरपूर मध्ये रविवार पासून आपल्या सेवेत कॅथ लॅब वैद्यकीय सेवा

मुंबई पुण्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दूरदृष्टीने हा बदल घडवून आणण्याचे धाडस पंढरपुरातील नामवंत डॉ शितल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल पंढरपूर मध्ये रविवार पासून आपल्या सेवेत कॅथ लॅब वैद्यकीय सेवा मिळणार

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपुरातील कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रिक कार्डिओलॉजी नेहमीच कठीण वैद्यकीय व्यवसाय ठरला आहे बाल ह्रदयरोग असणारे अशा प्रकारचे पेशंट एकतर कमी असतात तसेच ते बालक असल्याने कमवते नसतात त्याच्या जोडीला त्या छोट्या पेशंटचे पालकांनी नुकतीच करिअरला सुरुवात केल्याने अशा ह्रुदय रोगाच्या पेशंटकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही त्यामुळे प्रौढांसाठी जे कार्डिओलाँजिचे कार्यक्रम आखले जातात त्यांच्या खांद्यावर हे बाल कार्डिओलॉजी चे कार्यक्रम पडतात म्हणून या छोट्या पेशंटना न्याय मिळत नाही त्या हृदयरोगाच्या बालकांना न्याय द्यायचा आहे सुपर स्पेशलिटी बालरोग हॉस्पिटलची कमतरता आणि त्याच्यापेक्षाही हॉस्पिटल मध्ये होणारे बाल कार्डिओलाँजीचे कार्यक्रम अगदी क्वचित होतात बाल कार्डिओलाँजीसाठी लागणारी कँथ लँब आणि ऑपरेशन थिएटर यासाठी होणारी आर्थिक गुंतवणूक जास्त असते त्यामानाने पेशंटचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे हॉस्पिटल चालवणे आर्थिक दृष्ट्या कठीण असते महाराष्ट्रामध्ये मुंबईतील बिजे वाडीया ,नारायण पेडियाट्रिक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्याशिवाय इतर कोणत्याही बालरोग हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रिक कार्डिअँक कार्यक्रम राबवले जात नाहीत यात काही आश्चर्य नाही पण त्याच्याही पलिकडे विचार करून आणि दूरदृष्टीने हा बदल घडवून आणण्याचे धाडस एका ग्रामीण भागातील डॉक्टरांनी केले ते म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर येथील डॉक्टर शीतल शहा . महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना पेडियाट्रिक कार्डिओलाँजीची सेवा उपलब्ध व्हावी या पवित्र भावनेने त्यांनी ग्रामीण भागासाठी अत्याधुनिक पेडियाट्रीक कँथेटरायझेशन, कार्डियाक ऑपरेशन थिएटर , कार्डियाक रिकवरी,निदान होण्याच्यादृष्टीने इकोकार्डिओग्राफिक लँब हे पंढरपूर येथे पेडियाट्रिक कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने केलेला आहे. कमल कांती मेडिकल फाऊंडेशनच्या डॉक्टर शितल शहा हॉस्पिटलमध्ये रूरल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलाँजी सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये या प्रकारचे हे पहिलेच हॉस्पिटल आहे येथे हृदयातील दोष दूर करण्यासाठी डिवाइस क्लोजर, बलून व्हाँव्लोप्लास्टीसह ओपन हार्ट सर्जरी जन्मजात ह्रदयरोग असणाऱ्या बालकांसाठी सुरू करण्यात आले आहेत. जन्मजात ह्रदयरोग असणाऱ्या बालकांना ज्यांच्यावर त्वरित उपचार व्हावेत तसेच आर्थिक दुर्बलग्रस्त रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता मुंबई पुणे येथे जावे लागणार नाही पंढरपुरातच ही सेवा मिळणार आहे हीच मोठी वैद्यकीय क्रांती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button