Pandharpur

लायन्स क्लब पंढरपूर मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

लायन्स क्लब पंढरपूर मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूरमधे लायन्स क्लब पंढरपूरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभ हस्ते दि ३० जुल्लै रोजी करण्यात आले. लायन सदस्य डॉ.आकाश रेपाळ नेत्र रुग्णालय व फेको सेंटर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. लायन संस्थेचे माजी प्रांताध्यक्ष MJF लायन सी.एम.पारेख यांच्या जन्म दिवसानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराची मेगा ऍक्टिव्हिटी घेण्यात आली.या शिबिरासाठी कोरोनासाठी केलेल्या नियमांचे पालन करुन शिबीरासाठी नावनोंदणी केलेल्या नागरिकांची टप्या टप्याने वेळ देउन तपासणी करण्यात आली व मोतीबिंदू परिपक्व झाला की नाही हे तपासून, रक्ताच्या तपासण्या व फिजिकल फिटनेस पाहण्यात आले. १०९ पेशंटची तपासणी करण्यात आली त्यामधून ४५ रुग्ण ऑपरेशनसाठी योग्य ठरले. रुग्णांची फिजिकल फिटनेस तपासणी लायन्स क्लब सदस्य ला.डॉ.अमित पावले यांनी मोफत करून दिली.त्याच प्रमाणे रक्ताच्या तपासण्या डॉ. विनायक जोशी यांनी अत्यल्प शुल्क आकारून करून दिल्या.
उद्घाटनावेळी आमदार मा.प्रशांतराव परिचारक यांनी कोरोनाच्या अत्यंत वाईट काळात बरेचसे व्यवसाय अजुनही सुरळीत चालु नाहीत अशा परिस्थितीत अंधत्वाकडे झुकलेल्या रुग्णांना दृष्टी देण्याचे अतिशय उदात्त कार्य लायन्स क्लबने केले याबाबत समाधान व्यक्त केले आणि यापुढील सामाजिक कार्यासाठी आम्ही लायन्स क्लबच्या सदैव पाठीशी राहू असे सांगितले.यानंतर क्रमाक्रमाने ४५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आले व ऑपरेशन नंतरची आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. लायन्स क्लब ची ही सिग्नेचर ऍक्टिव्हिटी ठरवण्यात आली असल्याचे लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले व लायन्स क्लब पंढरपूर या वर्षामध्ये डोळ्याच्या विकारा संदर्भातील विवीध अँक्टीवीटी राबवणार असल्याचे सांगितले व सदर अँक्टीवीटी दर महिन्यात रेपाळ नेत्र रुग्णालयामध्ये राबवण्यात येणार असल्याचे डॉ आकाश रेपाळ सांगितले.
प्रकल्प प्रमुख ला.राजीव कटेकर यांनी या प्रकल्पाला सर्वतोपरी मार्गदर्शन केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सेक्रेटरी ला.ललिता कोळवले उपाध्यक्ष ला.डॉ. मृणाल गांधी, ला.डॉ. दिपाली रेपाळ यांनी परिश्रम घेतले. या प्रकल्पासाठी रोहन लॅबचे डॉ. विनायक जोशी अँडव्होकेट ला.भारत वाघुले, ला.मुन्नागिर गोसावी, ला मंदार केसकर, ला.सुरेखा कुलकर्णी, ला.ईम्रान मुल्ला, ला.डॉ.प्रांजली शिंदे, डॉ. रोहित शिंदे, श्री.प्रसाद रेपाळ,सौ विद्या रेपाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ला.दिपाली रेपाळ यांनी केले व आभार ला. मंदार केसकर यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button