Nashik

नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करा, शेतकऱ्यांनी लावले गावागावात फलक

नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करा, शेतकऱ्यांनी लावले गावागावात फलक

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली थांबवा यासाठी शेतकऱ्यांनी गावागावात फलक लावले आहे श्री सचिन पाटील यांची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक ला निवड झाल्यानंतर त्यांनी विविध शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतमालाचे बुडालेले पैसे मिळवून दिले शेतकऱ्यांची देणी देण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले त्यामुळे कोरोना असला तरी शेतकऱ्यांना समाधान वाटत होते शेतकरी बिनधास्त शेतमाल विक्री करत होता मात्र त्यांच्या बदलीची बातमी ऐकताच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष व नाराजीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे शेतकर्‍यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांची बदली थांबवा असे फलक गावागावात व शहरात दिसू लागली आहे नाशिक ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देतात त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्‍यावर गुन्हे दाखल करण्यात तसे पत्रक काढण्यात आले त्याप्रमाणे पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष तयार केला शेकडो शेतकऱ्यांची तक्रारीचे निवारण करण्यात आले ज्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला अशा व्यापार्‍यावर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले काही व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक लहरी निसर्ग यामुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलीस अधीक्षकांच्या रूपाने पोलिसांनी मदतीचा हात दिला होता. शेतकऱ्यांचा सिंघम व हितचिंतक पोलीस अधीक्षक सचिन पाटील त्यांच्या बदलीची बातमी ऐकताच जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले व शेतकर्‍यांच्या वतीने त्यांची बदली थांबवा असे गावागावात फलक लावण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button