Ratnagiri

मागासवर्गीयांची पदोन्नतीत अन्यायकारक असणारा शासनादेश रद्द करा: सुशिलकुमार पावरा

मागासवर्गीयांची पदोन्नतीत अन्यायकारक असणारा शासनादेश रद्द करा: सुशिलकुमार पावरा

रत्नागिरी : मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीत अडचण आणणारा दिनांक 18 फेब्रुवारी 2021 चा शासननिर्णय रद्द करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की , संविधानाच्या कलम 16( 4 अ )चा भंग करणारा 18 फेब्रुवारी 2021 चा शासननिर्णय आदेश रद्द करून सुधारित आदेश निर्गमित करावा व सर्व मागासवर्गीय कर्मचारी यांना बिंदूनामावली नुसार पदोन्नती देण्यात यावी. हा शासननिर्णय महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवर असणारे मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर हेतूपुरस्सर अन्यायकारक असा आहे.आरक्षित कोट्यातील 33% मागासवर्गीयांच्या जागा व अनुशेष सेवाजेष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून भरण्याचे सूचित करणारा शासननिर्णय मुळे राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे व असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने याचा अभ्यास करावा व पदोन्नती देताना कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याबाबत विचार करावा. व मागासवर्गीय कर्मचारी यांना अडचणीत आणणारा दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजीचा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button