Amalner

संगणीकृत ७/१२ मधील इतर हक्कातील कालबाह्य नोंदी कमी करणेसाठी कँप लावा..माजी आमदार साहेबराव पाटील यांची मागणी

संगणीकृत ७/१२ मधील इतर हक्कातील कालबाह्य नोंदी कमी
करणेसाठी कँप लावा..माजी आमदार साहेबराव पाटील यांची मागणी

अमळनेर उपरोक्त विषयांकीत संदर्भाधीन क्रमांक १ व २ संदर्भाधीन पत्रान्वये विविध
शासन निर्णय / परिपत्रकेद्वारे यापूर्वी कमी करण्याच्या संदर्भीय पत्रानुसार मा. विभागीय आयुक्त, नासिक विभाग नासिक यांचे कार्यालयाकडून (भूसूधार शाखा) सुचना देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त संदर्भीय पत्रांत दिलेल्या सुचनांनूसार काही कालबाह्य नोंदी या चौकशी व त्या अन्वये आदेशानुसार कमी करणेबाबत कालबाह्य नोंदीचा व करावयाचा तपशिल देण्यात आलेला आहे.

सबब उपरोक्त विषयांकीत संदर्भाधीन पत्रान्वये कालबाह्य नोंदी वेळोवेळी
निघालेल्या शासन निर्णयानुसार संगणीकृत ७/१२ मधून फेरफार घेवून कमी करण्यासाठी तालुका,मंडळ स्तरावर कँप आयोजित करण्यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केली आहे.

संबंधित लेख

Back to top button