भुसावळ

भुसाळात संविधान बचावो समितीतर्फे मूक मोर्चा

भुसाळात संविधान बचावो समितीतर्फे मूक मोर्चा

(प्रतिनिधी लियाकत शाह)
भुसावळ : केंद्र सरकारने काळा कायदा रद्द करण्याची मागणी. भारत सरकारने नागरीकत्व कायद्यात केलेली दुरूस्ती रद्द करण्यासह एनआरसी कायदा लागू न करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता रजा टॉवरपासून संविधान बचाओ समितीतर्फे प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांतर्फे प्रांताधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. मोर्चात सुमारे चार हजारापर्यत मोर्चेकरी होते. कायदा रद्द करण्याची मागणी. रजा टॉवर चौकात जमा झालेल्या मोर्चेकऱ्यांना मौलाना इम्रान (नाशिक) आणि जगन सोनवणे, एमआयएमचे फिरोज शेख यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द झाला पाहीजे, जोपर्यत कायदा रद्द होत नाही, तोपर्यत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोर्चात संविधान बचाओ समितीचे सदस्य हाजी सलीम चुडीवाले, मनव्वर खान, एमआयएमचे फिरोज शेख, पीआरपीचे जगन सोनवणे, साबीर शेख रोशन, दानिश पटेल, साजीद बागवान, निळकंठ फालक, अशरफ कुरेशी, अॅड. एहतेशाम मलिक, जे.बी. कोटेचा, योगेद्रसिंह पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button