Dondaicha

दोडांईचा येथे मा.मंत्री नारायण राणेंचा पुतळा दहन. गुन्हा दाखल करण्याची दोंडाईचा शहर शिवसेनेची मागणी

दोडांईचा येथे मा.मंत्री नारायण राणेंचा पुतळा दहन.
गुन्हा दाखल करण्याची दोंडाईचा शहर शिवसेनेची मागणी.

असद खाटीक

दोडांईचा- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धवजी ठाकरेसाहेब यांचा नारायण राणे यांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेत व समस्त शिवसैनिकांमधे प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. याचाच परिणाम म्हणुन दिनांक २७/१०/२०२० वार मंगळवार रोजी दोंडाईचा शहर शिवसेना शाखेकडुन नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आझाद चौक येथे दहन करण्यात आले.

यावेळी दोंडाईचा पोलिस स्टेशनचे प्रभारी,आय.पी.एस. अधिकारी श्री.पंकजजी कुमावत साहेब यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.त्यात मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असुन ते महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेचे प्रतिनिधित्व करते. तसेच करोना संकटाच्या अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सक्षमपणे महाराष्ट्र राज्याला संकटाच्या गर्तेतुन बाहेर काढणारे मुख्यमंत्री आदरणीय ना. श्री. उद्धवजी ठाकरेसाहेब यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्यामुळे ,या महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असुन तमाम जनतेचा अपमान झाला आहे.त्यामुळे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी या निवेदनाच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे श्री चेतन राजपूत,श्री शैलेश सोनार, श्री दिपक मराठे, श्री आबा चित्ते, श्री राकेश पेटकर,श्री विजय भोई, श्री चुडामण बोरसे, श्री देवेंद्र अहिरे, श्री निखिल जयसिंघानी,श्री मोहित राजानी,श्री पंकज चैनानी,श्री निलेश चौधरी,श्री भुषण चौधरी,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button