Amalner

चौबारी गावात एकाच रात्री ५ ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास… पोलिसांनी केले श्वान व अंगुली निर्देशक पथकाला पाचारण…

चौबारी गावात एकाच रात्री ५ ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास…

पोलिसांनी केले श्वान व अंगुली निर्देशक पथकाला पाचारण…

अमळनेर :- तालुक्यातील चौबारी येथे दि. १२ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखोचा ऐवज लंपास केला. त्यात १ लाख रुपये रोख व २ लाखाचे ५ तोळे सोने असा ३ लाखाच्या ऐवजाचा समावेश आहे.
हिंमत धुडकू पाटील (वय ९०)आणि कल्पना राजीव देसले (वय ५०) हे आपल्या राहत्या घरी पुढील भागात रात्री झोपले असता मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करुन १ लाख रुपये रोख व २ लाखाचे ५ तोळे सोने असा ३ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. शिवाय सोमा सखाराम कढरे, रवींद्र चिंधु पाटील, शांताराम डिगा पाटील, सुधाकर बाजिराव पाटील यांच्या घराचाही कडीकोंडा तोडत चोरीचा प्रयत्न केला. पैकी सोमा कढरे यांच्या घरातून दोन पोती पितळी भांडी चोरट्यांनी लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरिक्षक वैभव पेठकर यांनी भेट देत घटनेची पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव पोलीस मुख्यालयातून श्वान व अंगुली निर्देशक पथकाला पाचारण करण्यात आले होते. कल्पना देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन १२७/२०२१ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक वैभव पेठकर करत असून सहकार्य बिट अमलदार भास्कर चव्हाण व सचिन निकम यांचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button