Indapur

इंदापूर मध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

इंदापूर मध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी
दत्ता पारेकर इंदापूर
इंदापूर : येथील डाॅ. आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती- २०२१ च्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
‘ विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युध्द नव्हे तर बुद्ध हवा आहे. जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा समता आणि शांततेचा विचार या जगाला तारक ठरु शकतो. असे प्रतिपादन पुणे जिल्हा आर.पी.आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी केले.
सुरुवातीला नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांनी बुद्ध वंदना, त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन धम्मपुजा घेतली.
यावेळी पुणे जिल्हा आर. पी. आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे, नामांकित बांधकाम व्यावसायिक वास्तुविशारद वसंतराव माळुंजकर, बारामती लोकसभा मतदार संघ आर.पी.आय कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर.पी.आय.तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा.अशोक मखरे, बाळासाहेब मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मखरे, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष प्रा. सुहास मखरे, पुणे जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, अॅड. किरण लोंढे, सुरज मखरे, पी.आर.पी.चे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, आनंद मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, प्रा. मयूर मखरे, मुख्याध्यापक शशिकांत मखरे, विनय मखरे, सुहास मखरे, अनिल साबळे, मुकादम बापुराव मखरे, विकास साबळे, वसिम बागवान इत्यादी उपस्थित होते.
महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यामध्ये पद्मिनी मखरे, हौसाबाई मखरे, उषा मखरे, सविता मखरे, अलका मखरे, शोभा मखरे, आशालता मखरे, शितल गाडे, पुनम शेळके, प्रमिला मखरे, सुनंदा ओव्हाळ, रिया मखरे, दिपाली मखरे, काजल लोंढे, प्रतिक्षा मखरे, विवेका मखरे, पौर्णिमा मखरे, मयुरी मखरे, अश्विनी काकडे, पुजा लोंढे, अनुष्का काकडे, कोयल मिसाळ इत्यादी.
जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुहास मखरे, कार्याध्यक्ष उत्तम गायकवाड, महासचिव अक्षय मखरे, खजिनदार पवन मखरे, उपाध्यक्ष प्रतिक भोसले, दर्याराज मखरे, सहखजिनदार प्रशांत मखरे, सहसचिव सिद्धार्थ गाडे, सहकार्याध्यक्ष संभाजी मखरे इत्यादींनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button