Pimpri

?Breaking..पुनावळे खोदकाम करताना सापडला ब्रिटिशकालीन बॉम्ब

पुनावळे खोदकाम करताना सापडला ब्रिटिशकालीन बॉम्ब

पिंपरी : पुनावळे येथे शनिवारी (दि. १९) खासगी गृहप्रकल्पाच्या बांधकाम साईटवर खोदकाम करताना ब्रिटीशकालीन बाॅम्ब सापडला आहे. पोलिसांनी बाॅम्ब ताब्यात घेतला असून, बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे गृहप्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात असताना ब्रिटिशकालीन बाॅम्ब आढळून आला. त्यावेळी जेसीबी चालक व कामगारांनी तेथील सुपरवायजरला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळविण्यात आले.
हिंजवडी पोलीस तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाॅम्ब ताब्यात घेतला. तसेच याबाबत पुणे शहर पोलीस दलाच्या बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला माहिती देण्यात आली आहे. या पथकाकडे बाॅम्ब देण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button