Patiyala

Breaking News निर्भयाच्या आरोपींना  3  मार्चला फाशी ?? अजूनही आहेत आरोपींकडे कायदेशीर पर्याय

? Breaking News

निर्भयाच्या आरोपींना 3 मार्चला फाशी ??

अजूनही आहेत आरोपींकडे कायदेशीर पर्याय

प्रा जयश्री दाभाडे

पटियाला

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना 3 मार्चला फासावर लटकवले जाणार आहे. या चारही नराधमांना 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे.

सामूहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होते . या प्रकरणात दोषींकडून फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

मुकेशने फाशी टाळण्यासाठी सर्वच कायदेशीर प्रयत्न केले होते. याची दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांनी फेटाळून लावली होती.
चारही आरोपींनी गेल्या दोन दिवसांपासून खाणं-पिणंच सोडल होत.

Breaking News निर्भयाच्या आरोपींना  3  मार्चला फाशी ?? अजूनही आहेत आरोपींकडे कायदेशीर पर्याय

चारही दोषींना फासावर लटकवण्याची तारीख 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता ठरविण्यात आली होती . यादरम्यान मुकेश व्यतिरिक्त तीघांपैकी कोणी दया याचिकेचा अर्ज केल्यास पुन्हा काही दिवसांसाठी ही फाशी पुढे ढकलण्यात येईल. यानंतर पुन्हा फाशीची नवीन तारीख दिली जाईल अशी माहिती वकिलांनी दिली होती.

निर्भया’ बलात्कार प्रकरणातल्या दोषींची फाशीची शिक्षा टळली आहे होती .आता पुन्हा 3 मार्च 2020 रोजी फाशी दिली जाणार आहे.
त्यानंतर निर्भयाच्या आईने मात्र अत्यन्त दुःख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. दोषींची फाशी सतत टाळून आम्हाला त्रास दिला जात असल्याचं निर्भयाच्या आईनं म्हटलंय.

Breaking News निर्भयाच्या आरोपींना  3  मार्चला फाशी ?? अजूनही आहेत आरोपींकडे कायदेशीर पर्याय

मध्यंतरी उच्च न्यायालयाच्या वकील कोर्टाच्या वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी दिलेल्या निवेदनाने नवा वाद निर्माण केला होता. वास्तविक इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईला दोषींना क्षमा करण्याचे आवाहन केले होते. इंदिराच्या या विधानामुळे निर्भयाची आई आशादेवी दुखी झाल्या होत्या.
यावर त्यांनी आपल्या मुलांच्या बाबतीत असे घडले असते तर काय केले असते असा प्रश्न विचारला होता.

यानंतर दि 1 फेब्रुवारी 2020 रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार होती.परंतु पटियाला उच्च न्यायालयात आरोपीं तर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे निर्भया च्या आरोपींची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे होती .

2012 मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार केला होता.14 दिवस मृत्यू शी झुंज दिल्यानंतर निर्भया ने प्राण सोडले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण देशात जनक्षोभ उसळला होता.

Breaking News निर्भयाच्या आरोपींना  3  मार्चला फाशी ?? अजूनही आहेत आरोपींकडे कायदेशीर पर्याय

16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीमधल्या रस्त्यावर एका बसमध्ये ही घटना घडली. या भीषण घटनेनंतर देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले. दोषींना तत्काळ फासावर लटकवलं जावं अशी मागणी त्यावेळी जनतेकडून होत होती.
आता पुन्हा निर्भया च्या दोषींना शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणावी या साठी पुन्हा रस्त्यावर जनता उतरेल का/फक्त मेणबत्या पेटवून निर्भया ला न्याय मिळेल का?निर्भया ची आई एकटी च लढाई लढत आहे या लढ्यात सर्व सामान्य मेणबत्ती पेटवणारी जनता त्यांना साथ देईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पटियाला हाऊस न्यायालयाकडून या संदर्भात नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार या चारही दोषींची फाशीची तारीख 3 मार्च ही ठरली आहे. दोषींकडे अद्यापही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे आरोपींच्या वकिलांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Back to top button