Nashik

?Breaking…. पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करून तात्काळ लसीकरण करा..ना छगन भुजबळ यांची मागणी

?Breaking…. पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करून तात्काळ लसीकरण करा..ना छगन भुजबळ यांची मागणी
नाशिक मार्च-२०२० पासून संपूर्ण भारत देशात कोविड-१९ या विषाणुचा संसर्ग वाढत आहे. कोविड-१९ चा संसर्ग वाढत असताना महाराष्ट्र राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी व इतर अनेक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विभागातील कर्मचारी शासनाच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम करत आहेत.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहार व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपूर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ च्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमाद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत
असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून आपणही आपल्या राज्यात पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांचे तातडीने लसीकरण करणेबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button