Aurangabad

?Breaking.. कोरोना Update…कोरोना कहर ! औरंगाबादमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन ?

?Breaking.. कोरोना Update…कोरोना कहर ! औरंगाबादमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन ?

औरंगाबाद : शहरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवार किंवा मंगळवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस यंत्रणेने यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे. अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. आज किंवा उद्या यासंदर्भात घोषणाही होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी बोलताना सांगितले.
शहरात तीन दिवसांत तीनशेपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यामुळे कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालयात कोरोनाचे २,४०० सक्रिय रुग्ण दाखल आहेत.
कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे प्रशासन आता कठोर निर्णय घेणार असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपासून १० दिवसांचा लॉकडाऊन लावण्यावर प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. तसेच परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील जवळपास तीनशे कुटुंबातील सदस्य बाधित आहेत. शहरात बाधितरुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मार्चच्या २ तारखेपासून हा आकडा ३०० वर गेला आहे. तीन दिवसांतच एक हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. एका घरातील एक सदस्य बाधित आढळून आल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली तर ते देखील बाधित निघत असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे तीनशे कुटुंबातील दोन किंवा तीन सदस्य कोरोनाबाधित निघाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बाधित रुग्ण रेट १२ ते १५ टक्क्यांवर…
शहरात दररोज किमान दोन हजार नागरिकांची तपासणी होत आहे. बाधित रुग्ण निघण्याचा रेट हा १२ ते १५ टक्के इतका आहे. साधारणपणे ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असेल तर कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचे मानले जाते. मात्र, शहराचा हा रेट १२ ते १५ टक्क्यांवर गेल्यामुळे कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याचे सुत्रांनी सांगितले. या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी सात कोविड केअर सेंटरसह ४० खासगी रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शुक्रवारी ४५९ रुग्णांची वाढ, ५ मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्येने शुक्रवारी तब्बल चारशेचा आकडा ओलांडला असून, ४५९ नवे रुग्ण दिवसभरात आढळले, तर ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७९ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली असून २९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अशी आहे उच्चांकी वाटचाल…
४८६ रुग्ण – ८ सप्टेंबर
४६६ रुग्ण – ३ सप्टेंबर
४५९ रुग्ण – ५ मार्च

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button