Baramati

बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..

बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – बारामती तालुका पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना बातमीदारांकडून काल मध्यरात्रीनंतर अशोक लेलंड टेम्पो मधून विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथून आणलेला गांजा हा विक्रीसाठी दहिवडी जि सातारा व सांगली येथे बारामती मार्गे जाणार आहे अशी माहिती प्राप्त झाली होती.पोलीस निरीक्षक श्री आण्णासाहेब घोलप यांनी सदरची माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो यांची परवानगी घेऊन अंमली पदार्थ विरोधी कारवाई कायद्याच्या कायदेशीर पूर्तता करून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लगूटे व प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम बनवून मोठा पाऊस सुरू असतांनाही भिगवण व पाटस रोडवरून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली.
तसेच,दोन्ही रस्तावरील डाबे, हॉटेलवर थांबलेली वाहने तपासली.रात्री 3:00 वाजण्याच्या सुमारास ड्राइवर ढाब्याजवळ बारामतीच्या दिशेने येणाऱ्या अशोक लेलंड टेम्पोला सपोनि लगुटे व पथकाने थांबण्याचा इशारा करूनही टेम्पो चालकाने टेम्पो न थांबवता बारामती दिशेने वेगात घेऊन जाऊ लागला.त्यामुळे संशय आल्याने सपोनि लगुटे व पथकाने सरकारी वाहन व खाजगी कार मधून टेम्पोचा पाठलाग करून बऱ्हाणपूर फाटा येथे टेम्पोस वाहने आडवी मारून उभा केला.
टेम्पची तपासणी केली असता टेम्पो क्र एम. एच.10 सी.आर.4326 मध्ये तब्बल 46 लाख रुपये किमतीचा 312 किलो गांजा आढळून आला.टेम्पोमधील चार इसमाची चौकशी केली असता,सदरचा गांजा हा विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथून आणला असल्याचे कळले.व तो विक्रीसाठी दहिवडी जि सातारा व सांगली येथे घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे.
आरोपीमध्ये 1) विजय जालिंदर कणसेप रा कानरवाडी ता कडेगाव जि सांगली 2)विशाल मनोहर राठोड, चालक रा नागेवाडी ता खानापूर जि सांगली 3) निलेश तानाजी चव्हाण रा आंधळी ता माण जि सातारा 4)योगेश शिवाजी भगत रा शिरसूफळ ता बारामती जि पुणे यांच्यावर एनडीपीएस कायदा 1985 कलम 20ब,22 गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस निरीक्षक श्री आण्णासाहेब घोलप,सपोनि योगेश लगुटे,पोलिस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे,पोलीस हवालदार अनिल ओमसे,भानुदास बंडगर, दत्तात्रय सोननिस, पोलीस नाईक अनिल खेडकर,परिमल माणेर,पो कॉ रणजित मुळीक,संतोष मखरे,राजेंद्र काळे,प्रशांत राऊत,अमोल नरुटे, दत्तात्रय मदने,नंदू जाधव,विनोद लोखंडे, भुलेश्वर मरळे, पोपट कवीतके,मंगेश कांबळे,योगेश चितारे,चालक अबरार शेख यांनी कामगिरी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button