Pune

मावळ तालुक्यातील विविध समस्या सोडवण्याची बिरसा क्रांती दलाची तहसिलदाराकडे मागणी

मावळ तालुक्यातील विविध समस्या सोडवण्याची बिरसा क्रांती दलाची तहसिलदाराकडे मागणी

पुणे / प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

बिरसा क्रांती दल मावळ तालुका वतीने तहसीलदार यांना रेशन कार्ड आधार लिंक करण्याबाबत निवेदन देण्यात आले. मावळ तालुक्यातील अनेक लोक हे आधार लिंक नसल्यामुळे मोफत रेशनिंग मिळत नाही तसेच त्यांना पात्र लाभार्थी म्हणून रेशनिंग उपलब्ध करून देण्यात यावे.
मावळ तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुसकान भरपाई देण्यात यावी. याबाबत अंमलबजावणी करावी.
सावळा गावातील चक्रीवादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरू केला नाही. आंदर मावळातील विज बिल माफ करावी कोरोणा आजाराने पहिलेच रोजगारावर गदा आणली आहे त्यामुळे लोकांचा कंबरडे मोडले असून विज बिल माफ करावी.

मावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी बांधकामासाठी आदिवासी समाजाच्या जमिनी वापरता येत नाहीत. त्यामुळे वन विभागाने आपल्या हद्दीतील जमिनी बांधकामासाठी परवानगी द्यावी. अशाप्रकारे विविध मागण्यांसंदर्भात वनविभाग अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी, तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली
त्यावेळी बिरसा क्रांती दल मावळ तालुका अध्यक्ष अंकुश चिमटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारूती खामकर, पुणे जिल्हा संघटक विक्रम हेमाडे, मावळ तालुका उपाध्यक्ष कांताराम असवले, उपाध्यक्ष लहू दगडे, महासचिव उमाकांत मदगे, तालुका संघटक बाळू पावशे, संघटक अनिल गवारी, संघटक अशोक सुपे, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण कावळे, मधुकर कोकाटे आदी नागरिक उपस्तीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button