Pandharpur

निर्भया पथकाच्या कारवाईने दोघांना अडीच वर्षाची शिक्षा.

निर्भया पथकाच्या कारवाईने दोघांना अडीच वर्षाची शिक्षा.

प्रतिनिधी
रफीक अत्तार

पंढरपूर येथे मुलीची छेडछाड करणाऱ्या दोन युवकांवर त्वरित कारवाई करून अडीच वर्षाची शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावण्यात आला. निर्भया पथकाने जलद गतीने ही केस हाताळल्याने गुन्हेगारांना शासन देण्यात यश मिळाले.पंढरपूर मध्ये विनयभंगाच्या गुन्हयात जलदगतीने मा.न्यायलयाने दोन आरोपींना ठोठावली २ वर्ष ६ महीने कैदेची आणि ३५००रूपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी कैद,
पोलीसांनी २४ तासात तपास पुर्ण करून न्यायलायात दाखल केले दोषारोप पत्र,न्यायालयाने दिला २० दिवसात निकाल
याबाबचे सविस्तर वृत असे आहे कि, दिनांक ३०जानेवारी रोजी रात्री ९:३० वा.चे सुमारास पंढरपूर शहरातील समतानगर भागात एक उच्च शिक्षित मुलगी जेवण आटोपल्यावर रोडने शतपावली करत असताना आरोपी नामे १) विशाल नवनाथ माळी रा. शिवाजीनगर गोपाळपूर ता.पंढरपूर २) राहुल अशोक डांगे रा. गोपाळपूर ता. पंढरपूर व एक विधीसंशर्घीत बालक असे तिघेजणांनी मोटार सायकलवरुन तिचे मागे मागे जात तिचे जवळ जावून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार घडत असताना ती ओरडल्याने आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील लोकांनी त्यांना आडवून धरुन ठेवून पोलीसांना कळविल्याने पोलीसांनी त्या ठिकाणी तात्काळ जाउन आरोपींना ताबेत घेतले होते .
याच आरोपीतांनी तसेच विधी संघर्ष बालकाने दिनांक २८जानेवारी रोजी रात्री १० वा.चे सुमारास देखील मोटार सायकलवरुन त्याच भागात जावून शतपावली करणा-या दोन महाविद्यालयीन मुलींचा ही विनयभंग केला होता या घडलेल्या घटनेमुळे समतानगर भागातील लोक सर्तक होते. या दोन्ही घडलेल्या घटने बाबत दिनांक ३०जानेवारी रोजी समतानगर येथे राहणा-या एका मुलीने पंढरपूर शहर पोलीस ठाणेत वरील आरोपी व विधी संघर्ष बालकाचे विेरोधात तक्रार दिल्याने पंढरपूर षहर पोलीस ठाण्यात गुरनं 54/2022 भा.द.वि.सं.कलम 354,354(अ),354(ड),34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता व गुन्हयाचा तपास निर्भया प्रथक प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत भागवत यांचेकडे देणेत आला होता. पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत भागवत यांनी या गुन्हयाचा २४ तासाचे आत तपास पुर्ण करुन दि १फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील
न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांचे न्यायालयात दोशारोपत्र दाखल केले होते व गुन्हयाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवणेसाठी पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. अरुण पवार यांनी न्यायालयास पत्र देवून विनंती केली होती त्याप्रमाणे न्यायालयाने जलदगतीने खटला चालवून आरोपी विशाल नवनाथ माळी व राहुल अशोक डांगे यांना भारतीय दंड विधान संहिता विधान कलम 354, 34 मध्ये एक वर्श सक्त मजुरी व 2000 दंड, दंडन भरल्यास एक महिना साधी कैद, कलम 354 (अ) मध्ये सहा महीने सक्त मजुरी शिक्षा व 500 दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम 354 (ड) मध्ये एक वर्ष सक्तमजुरी व 1000 दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.आर.कामत यांनी सुनावून सर्व शिक्षा एकत्रात भोगण्याचा निकाल दिला आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सहा.सरकारी अभियोक्ता केतन शिवाजीराव देशमुख यांनी काम पाहिले असून त्यांनी न्यायालया समोर उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ देवून सरकारी पक्षाची ठाम बाजू मांडून महत्वाची भुमीका पार पाडली आहे. व गुन्हयाचे तपासकामात
,मा.पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम , मा.अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव साहेेब , मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग पंढरपूर श्री.विक्रम कदम सो तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पो.स्टे. श्री.अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आले असून निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत भागवत ,सहा. पोलीस उपनिरीक्षक, दत्तात्रय आसबे, पोना. प्रसाद औटी, पोकॉ. निलेश कांबळे, पोकॉ. अरबाज खाटीक, मपोना. निता डोकडे, मपोकॉ. कुसूम क्षिरसागर, चालक पो.हवालदार, अविनाश रोडगे यांनी या गुन्हयाचा तपास अत्यंत कौशल्यपूर्ण जलदगतीने पुर्ण केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button