Chandwad

पिकांच्या नुकसानभरपाई बाबत आ डॉ राहुल आहेरांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

पिकांच्या नुकसानभरपाई बाबत आ डॉ राहुल आहेरांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

उदय वायकोळे चांदवड

चांदवड व देवळा तालुक्यात पर्जन्यमानामुळे वातावरणामुळे उन्हाअभावी फळपीक भाजीपाला पीक व खरीपातील
पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येवून आर्थिक भरपाई .मिळणेकामी प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा अशी मागणी आ.डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाधारण डी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात आ.डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड देवळा मतदार संघात् गेल्या काही दिवसांपासून मोट्या प्रमाणात पर्जन्यमान होत आहे .परंतु चांदवड व देवळा तालुक्यातील काही गावांमध्ये शासनाच्या निहित मापदंडा इतके पर्जन्यमान झालेले नसले तरीही हवेचा तीव्र वेग व ढगाळ वातावरणामुळे उन्हाअभावी तशेच वादळ सदृश्य परिस्थिती यामुळे भाजीपाला पिके व फळ पिके व खरीपातील इ.पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या नैसर्गिक संकटामुळे पिके खराब झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
चांदवड व देवळा तालुक्यातील काही गावांमध्ये शासनाच्या विहित मापदंडा इतके पर्जन्यमान जरी झालेले नसले तरी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला देण्यात यावे तशेच झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळणे बाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button