Bollywood

Bollywood: ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली धमकी

Bollywood: ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली धमकी

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी देखील अशा लोकांपैकी एक आहे जिनं इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. दिव्यांकाला आपली ओळख बनवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण तिने हार मानली नाही आणि आता ती एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिव्यांकाने तिचे संघर्षाचे दिवस आठवले आणि तिला कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला हे सांगितले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिव्यांकाने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून दिली. तिने कास्टिंग काउचचा कसा सामना केला हे देखील सांगितले. इतकेच नाही तर, दिव्यांकाने सांगितले की, तिला तिचं करिअर खराब करु, संपवून टाकू अशा धमक्या आल्या होत्या.

दिव्यांकाने मुलाखतीदरम्यान सांगितले की, प्रॉडक्शनमधील एक व्यक्ती तिच्या प्रेमात पडली होती. तो मला प्रभावित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. पण मला त्यात काही रस नव्हता.
त्यानंतर तो पूर्ण बदला घेण्याच्या तयारीत होता. आता तिचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे आहे, आता तिच्याबद्दल चुकीच्या बातम्या देणार, तिला त्रास देणार.

दिव्यांकाने पुढे सांगितले की, कधी कधी अशी वेळ आली की पैसे नव्हते. मला माझी बिले भरायची होती, EMI भरायचे होते. प्रचंड ओझे होते.दिव्यांकाने पुढे सांगितले की एक फेज आला होता.
संपल्यावर मी कुणाला भेटायला गेले, तेव्हा मॅडम, तुम्ही खूप कारण देता. त्यामुळे काम देणार नाही, असं सांगण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button