Bollywood

Bollywood: कपूर घराण्यातील “ही” सुंदर अभिनेत्री होतेय लवकरच “ह्या”बिझिनेस मॅनशी विवाहबद्ध..!

Bollywood: कपूर घराण्यातील “ही” सुंदर अभिनेत्री होतेय लवकरच “ह्या”बिझिनेस मॅनशी विवाहबद्ध..!

सध्या बॉलिवूड मध्ये लग्नाचा सिझन सुरू आहे. अनेक मोठ्या स्टार्स नी या वर्षी विवाह करून संसार थाटला आहे.कॅट विक्कीच्या विवाहानंतर आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे.तर दुसरीकडे कपूर घराण्यातील एका सुंदर अभिनेत्रीच्या विवाहाची चर्चा सुरू आहे. कपूर घरातील कोणतीही बातमी नेहमी चर्चेचा विषय असते. आता करिश्मा कपूर तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन संदीप तोष्णीवालसोबत लग्न करणार आहे अशी महत्वपूर्ण बातमी हाती लागली आहे. दोघेही अनेक वेळ ठिकाणी एकत्र आढळतात. 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आहेत.
संजय कपूरसोबत लग्न केल्यानंतर नात्यात दुरावा निर्माण झाल्याने दोघे विभक्त झाले. दीर्घकाळ अविवाहित राहिल्यानंतर त्यांच्या आयुष्यात दिल्लीतील व्यापारी संदीप तोष्णीवाल आले.
करिश्माप्रमाणेच संदीपचेही लग्न झाले होते, त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अर्शिता होते. संदीपने नुकताच आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. संदीपला २ मुलीही आहेत. घटस्फोटापूर्वी संदीपच्या पत्नीने देखभाल म्हणून 2 कोटी रुपये, दिल्लीतील घर आणि दोन्ही मुलींसाठी 3 कोटी रुपये देखभाल म्हणून घेतले होते.
करिश्माला सध्या आपल्या मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कुटुंब वाढवण्याचा तिचा कोणताही विचार नाही.संदीप तोष्णीवाल हा एसएस तोष्णीवाल हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीजमधील एक प्रसिद्ध नाव आहे. संदीप हा दिल्लीचा प्रसिद्ध उद्योगपती आहे. संदीप तोष्णीवाल मुंबईतील युरोलिक हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या फार्मास्युटिकल कंपनीचे सीईओ आहेत. संदीप तोष्णीवाल यांचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 7 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.
संदीप आणि करिश्मा दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. संदीप अनेकदा कपूर फॅमिली पार्टीमध्ये दिसला होता. याशिवाय दोघेही अनेकदा स्पॉट झाले आहेत.आता लवकरच दोघे विवाहबद्ध होण्याची चिन्हे दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button