Pandharpur

पंढरपूर शहरातील वाहतूक मार्गात बदल

पंढरपूर शहरातील वाहतूक मार्गात बदल

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवीन कराड नाका ते कॉलेज चौक पर्यंत लिंक रोडवर राज्यमार्ग क्रमांक 143 ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 ला जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथवर सुरु आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याने या मार्गावरील वाहतुक मार्गात दिनांक 17 जुलै 2021 पर्यंत बदल केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी दिली. वाहतूक मार्गातील बदल खालील प्रमाणे पंढरपूर शहरात प्रवेश करणार्या जड वाहने कोल्हापूर, विजापूर , सांगली,मिरज,सांगोला, मार्गे येणारी जड वाहने गादेगांव येथून सातारा- पंढरपूर रस्त्यावरुन वाखरी मार्गे येतील.पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या जड वाहनांबाबत सूचना -अहमदनगर बार्शी, मोहोळ, टेंभुर्णी यामार्गे येणारी जड वाहने कॉलेज चौक, वाखरी येथून पंढरपूर –सातारा रस्त्यावरुन गादेगांव मार्गे इच्छित स्थळी जातील.पंढरपूर शहरातून राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या नवीन कराड नाका ते कॉलेज चौक जोड मार्गावरील चौपदरीकराणाचे एका बाजूचे काम पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आषाढी एकादशी 20 जुलै 2021 रोजी असल्याने राज्य शासनाने मान्यता दिलेल्या पालखी सोहळ्यांना वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आषाढी वारी पूर्वी काम करण्यात येणार आहे. या रस्ता कॉक्रीटींकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रे रुंद असल्यामुळे तसेच बाजुचा रस्ता खोदल्यामुळे जड वाहनांना वाहतुकीसाठी पुरेसा मार्ग मिळत नसल्याने वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या व जलद गतीने काम करण्याच्या दृष्टीने वाहतुक मार्गात बदल केला असल्याचेही कार्यकारी अभियंता श्री. गावडे यांनी सांगितले वाहनधारकांनी बदलेल्या वाहतूक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button