Bollywood

Bollywood: प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली…”हे” चार चित्रपट होतील येत्या काही दिवसांत प्रदर्शित..!

Bollywood: प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली…”हे” चार चित्रपट होतील येत्या काही दिवसांत प्रदर्शित..!

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आज चार सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर झाल्या आहेत. आज एक, दोन नव्हे तर चार चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यात ‘झुंड’, ‘राधे श्याम’, ‘भूल भुलैया 2’, ‘अनेक’ या सिनेमांचा समावेश आहे.

झुंड (Jhund) :

बॉलिवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेनं केलं आहे. झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आता हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

राधे श्याम (Radhe Shyam) :

बहुप्रतिक्षित ‘राधे श्याम’ सिनेमाची कोरोनामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता निर्मात्यांनी नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. आता हा सिनेमा 11 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास ‘राधे श्याम’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रभाससोबत पूजा हेडगेदेखील मुख्य भूमिकेत आहे.

भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) :

कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ सिनेमा 20 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी केले आहे.

अनेक (Anek) :

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या आगामी ‘अनेक’ सिनेमाची अखेर रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा सिनेमा 13 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अनुभव सिन्हाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा आधी 31 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना जोशुआची भूमिका साकारत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button