Bollywood

Bollywood: रेखा सोबत अमिताभ सारखी दिसणारी “ती” व्यक्ती..?

Bollywood: रेखा सोबत अमिताभ सारखी दिसणारी “ती” व्यक्ती..?

मुंबई बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री रेखाचे आयुष्य एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. आजही रेखा बर्‍याच इव्हेंट्समध्ये आणि पार्ट्यांमध्ये संपूर्ण श्रृंगार करुन हजेरी लावताना दिसते, यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत एक रहस्य म्हणजे वर्षानुवर्षे तिच्यासोबत सावली सारखी राहणारी ही महिला कोण आहे. याबाबत देखील अनेकांना प्रश्न आहे.
कितीही मोठी स्टार असली तरी तिचे आयुष्य नेहमीच रहस्यांनी भरलेले आहे. त्यात रेखाच्या एका वादाची सर्वात जास्त चर्चा रंगली, जो तिच्‍या सेक्रेटरी फरजानाशी संबंधित आहे.
फरजाना एकेकाळी रेखाची हेअरस्टाइलिस्ट होती, पण आता तिला रेखाची सोल सिस्टर म्हटले जाते. फरजाना ही एकमेव व्यक्ती आहे जिला रेखाच्या जीवनकथेबद्दल सर्व काही माहित आहे.

फरजाना कोण आहे

रेखासोबत सतत असलेल्या या महिलेला रेखाची राजदार असेही म्हणतात. तिची सेक्रेटरी फरजाना अनेकदा रेखासोबत पार्टी, कार्यक्रम, अवॉर्ड शो, अगदी संसदेतही दिसते.
म्हणतात की रेखा जेव्हा तिच्या बेडरूममध्ये असते तेव्हा तिला कोणी आत येणे आवडत नाही. पण फरजाना आत जाऊ शकते.
रेखाच्या आयुष्यात फरजाना इतकी महत्त्वाची बनली आहे की तिच्या परवानगीशिवाय रेखापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही. 1980 मध्ये यश चोप्रा यांच्या सिलसिला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.

रेखाला भेटल्यानंतर फरजाना तिचे संपूर्ण काम पाहू लागली. फरजाना अनेकदा शर्ट पँट घालते आणि हेअरस्टाईल अमिताभ बच्चन यांच्यासारखी करताना दिसते.
रेखाच्या आयुष्यात अनेक पुरुष आले आणि गेले हे सर्वांना माहीत आहे. अमिताभ बच्चन ते विनोद मेहरा यांच्याशी तिचे नाते असल्याचे बोलले जाते. जेव्हा रेखाची लव्ह लाईफ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, त्याचवेळी फरजाना तिच्या आयुष्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button