Bollywood

Bollywood: रेखाच पुन्हा वादग्रस्त विधान..! पुरुषांच्या जवळ जाण्यासाठी व लग्नाआधी सेक्स आवश्यक…!

Bollywood: रेखाच पुन्हा वादग्रस्त विधान..! पुरुषांच्या जवळ जाण्यासाठी व लग्नाआधी सेक्स आवश्यक…!

मुंबई | भारतीय सिनेक्षेत्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना ओळखण्यात येतं. रेखांनी आपल्या कारकीर्दीत अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. पण रेखा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीतही आल्या आहेत.
रेखा सध्या सिनेक्षेत्रापासून दूर असल्या तरी रेखांनी अनेक शोमध्ये सहभाग नोंदवला आहे. सिनेपुरस्कार सोहळ्याला देखील रेखा या आवर्जून उपस्थित राहत असतात. अशातच सध्या रेखा यांच्या एक जुन्या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
रेखांनी लग्नाआधी सेक्सवर बोल्ड वक्तव्य केलं होतं. सेक्स केल्याशिवाय तुम्ही पुरुषाच्या फार जवळ येऊ शकत नाही. मी कधीच गरोदर राहिले नाही, हा योगायोग आहे. लग्नाआधी सेक्स खूप सामान्य आहे, असंही रेखा म्हणाल्या आहेत.
स्त्रीने फक्त हनिमूनलाच सेक्स करावा असे म्हणणारे सगळे संशयवादी मूर्खपणा करतात. पुरूषांवर रेखांनी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. परिणामी हे वक्तव्य धुमाकूळ घालत आहे.
काही दिवसांंपूर्वी रेखांनी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आपल्या नात्यावरही भाष्य केलं होतं. रेखा आणि अमिताभ एकमेकांच्या प्रेमात असल्याची अनेकदा चर्चा त्याकाळी होत होती.
अमिताभ बच्चन यांच्यावर तर सगळेच प्रेम करतात मग मी का प्रेम करणार नाही, असं वक्तव्य रेखांनी केलं होतं. रेखा यांच्या या वक्तव्यानंतर बाॅलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली होती.
रेखा या अविवाहित असूनही आपलं राहणीमान एखाद्या विवाहित स्त्री सारखं ठेवतात. अनेकदा यावरून रेखांना लक्ष्य करण्यात आलं पण रेखांनी जगाची परवा कधीच केली नाही. रेखाची ही खासियत त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते.
दरम्यान, रेखा नित्य नियमानं सिंदूर लावतात परिणामी त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर रेखांनी मी फक्त फॅशनसाठी सिंदूर लावते, असं म्हटलेलं अनेकदा पहायला मिळालं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button