Bollywood

Bollywood:प्रियंका चोप्रा झाली आई..!सोशल मिडिया वरून दिली निक आणि प्रियंका ने बातमी..!

Bollywood:प्रियंका चोप्रा झाली आई..!सोशल मिडिया वरून दिली निक आणि प्रियंका ने बातमी..!

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई बनली आहे. तिने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला असून ही खास बातमी प्रियांकानेच सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच तिने चाहत्यांना विशेष विनंतीही केली आहे. प्रियंका ने २०१८ मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनास याच्यासोबत विवाह केला.हे दाम्पत्य नेहमीच प्रकाशझोतात राहिलेलं आहे. आता खास बातमी देत या दाम्पत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.प्रियांका आणि निक या दाम्पत्याला अपत्यप्राप्ती झाली असून दोघांनीही एकसमान ट्वीट करून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.

सरोगसीच्या माध्यमातून आम्हाला अपत्यप्राप्ती झाली आहे. ही आनंदाची बातमी आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत. हे क्षण आमच्यासाठी खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे अशा आशयाचे आवाहन प्रियांका आणि निकने ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे. प्रियांका-निकने ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी, पूजा हेगडे, लारा दत्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी या दाम्पत्याचं अभिनंदन केलं आहे.पर्याय आतापर्यंत भारतातील अनेक सेलिब्रिटींनी निवडलेला आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख खान, आमीर खान, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर अशी अनेक नावे यात आहेत. आता प्रियांकाचे नाव या यादीत जोडले गेले आहे.

प्री-मॅच्योर आहे बाळ!
एका वृत्तानुसार, प्रियांका एका छोट्या परीची आई बनली आहे. प्रियांका-निकची मुलगी प्री-मॅच्युअर आहे, कारण प्रसूतीच्या तारखेपासून 12 आठवड्यांआधीच तिने बाळाचा जन्म दिला आहे.

हेल्दी होई पर्यंत हॉस्पटलमध्ये रहाणार न्यूबॉर्न बेबी!
रिपोर्टनुसार, दक्षिण कॅलिफोर्निया हॉस्पिटलमध्ये सरोगसीच्या माध्यमातून हे घडलं आणि जोपर्यंत नवजात बाळ निरोगी होत नाही तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील. मूल पूर्णपणे निरोगी झाल्यानंतरच प्रियांका आणि निक त्याला घरी घेऊन जाऊ शकतील. मात्र, या वृत्तांवर प्रियांका किंवा निक जोनासची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
प्रियांकाने पोस्ट करून खुलासा केला नाही की, तिला मुलगी झाली आहे की मुलगा, परंतु अशा बातम्या आहेत की प्रियंका पहिल्यांदाच एका मुलीची आई बनली आहे. लग्नाला 3 वर्षे झाल्यानंतर हा आनंद त्यांच्या घरी आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button