Bollywood

Bollywood: आता सारा अली खान प्रेमात..! हा व्यक्ती होणार नबाब घराण्याचा जावई..!

Bollywood: आता सारा अली खान प्रेमात..! हा व्यक्ती होणार नबाब घराण्याचा जावई..!

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.बॉलीवूड इंडस्ट्रीत सैफची छोटे नवाब म्हणून ओळख आहे.आता ह्या नबाब कुटुंबाचा जावई कोण होणार आहे याची उत्सुकता सर्वांना आहे.कारण सध्या सारा अली खानचे तिच्या प्रियकरासोबत चे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत.
सारा अली खान ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे.सारा अली खान सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने स्वत:ची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग देखील आहे.
सध्या सारा अली खान तिच्या प्रेमामुळे चर्चेत आहे. सारा अली खान बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत आहे.
सारा अली खान कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यात नेहमीच तिचे चाहते उत्सुक असतात. तिचे नाव बऱ्याचदा कार्तिक आर्यनसोबत जोडले गेले आहे. पण तिचा लाईफ पार्टनर कार्तिक नसणार आहे. साराचा हा जवळचा मित्र सहाय्यक दिग्दर्शक आहे.
साराने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
सारा अली खानच्या बॉयफ्रेंडचे नाव जेहान हांडा आहे. सारा अली खान अनेक दिवसांपासून जेहानसोबत दिसत आहे. दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात.
केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा आणि जेहान यांची भेट झाली होती. या चित्रपटात जेहान हा सहाय्यक दिग्दर्शक होता.
दोघांचे रोमॅन्टिक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुऴे सारा जेहानसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार का असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तसेच साराचा होणारा नवरा हा कोट्यवधींचा मालक असल्याची माहिती समोर आली आहे. 250 कोटींच्या मालमत्तेचा जेहान हा मालक आहे. तूर्त साराने जेहानसोबत लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button