Bollywood

Bollywood: आता फरहान अख्तर चढणार बोहल्यावर..! “ह्या” मराठी अभिनेत्रीसोबत करणार विवाह

Bollywood: आता फरहान अख्तर चढणार बोहल्यावर..! “ह्या” मराठी अभिनेत्रीसोबत करणार विवाह

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न बंधनात अडकले. त्यांच्यापाठोपाठ आता अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे.

फरहान आणि शिबानी मार्च महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. करोनाचा वाढता प्रभाव आणि बॉलिवूड कलाकरांना होणारा करोनाचा संसर्ग पाहाता त्यांनी लग्न खासगी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीय हजेरी लावणार आहेत.

फरहान आणि शिबानी गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत आहेत. करोनामुळे त्यांना लग्न आणखी पुढे ढकलायचे नाही. लग्नासाठी फरहान आणि शिबानीने ५ स्टार हॉटेल बुक केले असून लग्नासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाचीकडून कपडे डिझाइन करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

तीन वर्षांपूर्वी फरहान आणि शिबानी यांची भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो कायम चर्चेचा विषय ठरत होते. पण आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button