Bollywood

Bollywood: नायक नहीं खलनायक हुं मैं..!

Bollywood: नायक नहीं खलनायक हुं मैं..!

मुंबई बॉलिवूड मध्ये जसे नायक प्रसिद्ध आहेत तसेच खलनायक देखील..!जरी चित्रपटाचा खरा हिरो नायक असतो तरी हिंदी चित्रपटात असेही खलनायक आहेत ज्यांनी त्यांच्या भूमिकांमुळे नायकांपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळाली. उत्कृष्ठ अभिनयाने आपली छाप चाहत्यांच्या ह्या खलनायकानीं सोडली. अनेक चित्रपट इंडस्ट्रीत आले, ज्यांचे नायक कदाचित लक्षात राहीले नाही पण खलनायक कायमचे आठवणीत राहिले. या अभिनेत्यांनी खलनायक म्हणून चित्रपट सृष्टीत काम केले. आजही या खलनायकांचे चेहरे प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

  • अमजद खान

एक ही आदमी और वो है खुद गब्बर, ये हाथ हमको दे दे ठाकूर, कितने आदमी थे, ये रामगढ़ वाले अपनी बेटियों को कौन सी चक्की का आटा खिलाते हैं, तेरा क्या होगा कालिया, बहुत याराना लगता है, जो डर गया, वो मर गया, अरे, ओ सांबा, गब्बर के ताप से तुम्हे एक ही आदमी बचा सकता है, असे गब्बरचे प्रसिद्ध डायलॉग्ज आजही अजरामर आहेत. गब्बरची भूमिका अमजद खान यांनी साकारली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी ही भूमिका अजरामर तर केलीच, पण आजही ते चाहत्यांच्या मनात ते जिवंत आहेत. बॉलिवूडमधील खलनायकांचा विचार केला, तरी गब्बरचे नाव प्रथम येते.

  • प्राण

इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खान को कौन नहीं जानता, शेरखान ने शादी नहीं की तो क्या हुआ, लेकिन बारातें बहुत देखी हैं, शेर खान आज का काम कल पर नहीं छोड़ता, शेरखान ने शादी नहीं की तो क्या हुआ, लेकिन बारातें बहुत देखी हैं, चिल्लाओ नहीं साहब, वरना गला खराब हो जाएगा, “बर्खुदार…”, असे उत्तम डायलॉग्जने प्राण त्यांच्या काळातील सर्वात संस्मरणीय खलनायक बनले. आजही प्राण यांचे डायलॉग्ज चाहत्यांच्या ओठांवर आहेत.

  • अमरीश पुरी

अमरीश पुरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत, पण त्यांचा एक डायलॉग “मोगॅम्बो खुश हुआ…” आजही प्रसिद्ध आहे. अमरीश पुरी यांची खास गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या नकारात्मक भूमिकेत अशाप्रकारे प्राण फुंकले की, ते चित्रपटात नायकापेक्षा खलनायक म्हणून जास्त प्रसिद्ध झाले.

  • प्रेम चोप्रा

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रेम चोप्रा यांचे नाव खलनायकाच्या यादीत नाही, असे कसे होऊ शकते. उपकार या चित्रपटातून त्यांनी खलनायक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्यांचा प्रेम नाम है मेरा हा डायलॉग आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे.

  • शक्ती कपूर

शक्ती कपूर यांनी खलनायक म्हणून एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांतील दमदार भूमिकेसाठी ते आजही स्मरणात आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये त्यांना अनेकदा बलात्कारी व्यक्तीची भूमिका देण्यात आली होती.

  • गुलशन ग्रोव्हर

बॉलिवूडचा बॅड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुलशन ग्रोव्हर यांनी खलनायक म्हणून एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. राम लखन, मोहरा, १६ डिसेंबर, क्रिमिनल अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button