Amalner

बहुजन रयत परिषद संलग्नित मातंग समाजाची आढावा बैठक संपन्न:-

बहुजन रयत परिषद संलग्नित मातंग समाजाची आढावा बैठक संपन्न:-

अमळनेर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन रयत परिषद जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समजाची आढावा बैठक संपन्न झाली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दि.6 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे(अमळनेर)यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाची आढावा बैठक घेण्यात आली.आजही मातंग समाज आर्थिक, सामाजिक ,राजकीय विकासापासून कोसो दूर आहे त्यामुळे तालुक्यातील मातंग समाजाचा सर्वांगीण विकास जो उमेदवार साधण्याचा प्रयत्न करेल त्या पक्षाला आपण पाठिंबा देणार असल्याचा या आढावा बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला गेला.या बैठकीत अमळनेर तालुक्यातून बहुजन रयत परिषदेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.त्यात बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे,सल्लागार हरीचंद्र कढरे सर,तालुकाध्यक्ष संजय मरसाळे,शहराध्यक्ष सुरेश कांबळे,भाऊसाहेब जगदाने,राजू चंदनशिव,भावा चंदनशिव,नारायण गांगुर्डे,कैलास मरसाळे,रवी चंदनशिव,अनिल मरसाळे,दिपक गरुड,लखन चंदनशिव,संजय वाघ,राजेंद्र कांबळे,अजय जाधव,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button