Bollywood

बॉलिवूड डॉल कॅटरिना होतेय विवाहबद्ध..!डिसेंबर महिन्यात ह्या अभिनेत्याशी करेल लग्न

बॉलिवूड डॉल कॅटरिना होतेय विवाहबद्ध..!डिसेंबर महिन्यात ह्या अभिनेत्याशी करेल लग्न

मुंबई गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड ची बार्बी डॉल कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होती.सोशल मीडियावर दोघां संदर्भात अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. मध्यंतरी दोन्ही वेगळे झाले भांडण झाले अश्या देखील चर्चा रंगल्या होत्या.पण दोघांनी कधीच हे मान्य केले नाही की ते रिलेशनशिपमध्ये आहेत.आणि हे ही त्यांचं भांडण झाले आहे. आणि आता दोघांच्या लग्नाबद्दल बोलले जात आहे.

आता असे सांगितले जात आहे की विकी कौशल आणि कतरिना कैफ या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करू शकतात. विकी कौशल आणि कतरिना कैफ या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न राजस्थानच्या उदयपूरात विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे.

मात्र कॅट आणि विक्की कौशल यांनी कधीही याबद्दल मत व्यक्त केले नाही. परंतु दोघांनीही एकमेकांना डेट करत असल्याचे कधीही नाकारले नाही. दोघे ही आपल्या प्रेमाबद्दल बोलत नसले तरी त्यांची चित्रे खूप काही बोलतात. एकत्र पार्टी करतानाही माध्यमांनी या दोघांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. तर कॅट अनेक वेळा विकीचा टी-शर्ट परिधान करतानाही दिसली आहे.आता पाहू या डिसेंबर मध्ये हे जोडपं विवाहबद्ध होतय का..?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button