Bollywood

Bollywood: गहराईयांच्या प्रमोशन साठी दीपिकाचा जबरदस्त हटके लूक..!सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल..

Bollywood: गहराईयांच्या प्रमोशन साठी दीपिकाचा जबरदस्त लूक..!सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल..

मुंबई सध्या दीपिका पादुकोणच्या गेहराईयाँ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ह्या चित्रपटातील इंटिमेंट सीन बद्दल खूपच चर्चा झाली त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्या पूर्वी च प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे हा चित्रपट पाहण्याची.नुकताच हया चित्रपटाच्या प्रमोशन साठी दीपिका पदुकोण ने केलेल्या ड्रेसिंग मुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक. तिची स्टाईल, तिचे फोटो सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर चर्चेत असतात.

मागच्या काही दिवसांपासून दीपिका एका हटके स्टाईलच्या कपड्यांमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करताना पहायला मिळतेय.दीपिकाची ही हटके स्टाईल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या येऊ घातलेल्या गेहराईयाँ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती हा वेगळा लूक कॅरी करत असल्याचं बोललं जातंय.दीपिकाचा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरताना पहायला मिळतोय. तिच्या कपड्यांचा हा पॅटर्न अनेकांना भावला आहे.

गेहराईयाँ हा चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल. ओटीटीवरचा दीपिकाचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये पहायला मिळतेय. चित्रपटात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि अन्नया पांडे हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
गेहरांईया’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील सिद्धांत आणि दीपिका यांच्या इंटिमेट सिन्सनं अनेकांचे लक्ष वेधले.
या चित्रपटाचा ट्रेलर आता पर्यंत 40 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button