Bollywood

Bollywood: अधुरी प्रेम कहाणी…! ह्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता दिदी..!म्हणून केलं नाही लग्न..!

बॉलिवूड Breaking… अधुरी प्रेम कहाणी…! ह्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता दिदी..!म्हणून केलं नाही लग्न..!

मुंबई ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने जगातील श्रोत्यांना देखील मंत्रमुग्ध केलं. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला. लता दीदींच्या संगीत करिअरमधील सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण खूप कमी गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आज असाच एक त्यांच्या आयुष्यातील अनभिज्ञ माहिती आपल्याला देणार आहे. ती म्हणजे त्यांची अधुरी प्रेम कहाणी..!अशी एक कहाणी की अगदी एखादया चित्रपटात शोधावी..!हिर-रांझा, सोहनी-महिवाल यांच्या प्रेम कथेला मागे टाकणारी..!आपल्या प्रेमा खातर आयुष्यभर अविवाहित राहून दोघांनी आपले प्रेम,निष्ठा आणि दिलेले वचन पाळले..!आज काल च्या छिचोऱ्या प्रेम वीरांनी नक्कीच ह्यातून काही धडा घेण्यासारखा आहे..चला तर जाणून घ्या काय आहे कहाणी..!

लहानपणी कुंदनलाल सहगल यांची फिल्म बघून खास करून ‘चंडीदास’ हा सिनेमा पहिल्या नंतर लता दीदी म्हणतं की, मी मोठी झाल्यावर सहगल यांच्याशी लग्न करणार. पण त्यांनी शेवटपर्यंत लग्न केलं नाही. लता दीदींचे चाहते संपूर्ण जगात आहे आणि प्रत्येकाच्या मनात आजही एक प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे लता दीदींनी का लग्न केलं नाही?

प्रेमा खातर केला नाही विवाह..!डुंगरपूर राजघराण्याचे राजसिंह आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांच्या आणि लता मंगेशकर यांच्या नात्याविषयी बरेच दिवस अनेक चर्चा रंगत होत्या. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह खूप चांगले मित्र होते. हे दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. राजसिंह मुंबईत लॉचे शिक्षण घेत असताना त्यांची भेट हृदयनाथ यांच्यासोबत झाली होती. राजसिंह यांचे लतादीदींच्या घरी येणे-जाणे सुरु झाले होते. बघताबघता राजसिंह यांची लता यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली. असे म्हटले जाते, की राजसिंह यांनी आपल्या वडिलांना दिलेल्या एका वचनामुळे त्यांचे लतादीदींसोबत लग्न होऊ शकले नव्हते. मात्र त्यांची आणि लतादीदींची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली.

राजसिंह यांना होती क्रिकेटची विशेष आवड, बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले….

डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राजसिंह यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर क्रिकेट विश्वातही नाव कमावले. राजसिंह 16 वर्षे राजस्थानच्या रणजी टीमचे सदस्य होते. अनेक वर्षे त्यांनी बीसीसीआयसोबतही काम केले. त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले. भारतीय टीमच्या अनेक दौ-यांमध्ये त्यांनी मॅनेजरची भूमिका निभावली.लता दिदींच क्रिकेट प्रेम तर सर्वांनाचं माहीत आहे. हे ही कारण होत लता आणि राज यांच्या जवळ येण्याचं..!राज लता दिदीं ना मिठू या नावाने हाक मारत..त्यांच्या खिश्यात नेहमी टेप रेकॉर्डर असायचा त्यात लता दिदीची निवडक गाणी असत आणि ते पाहिजे तेंव्हा ती गाणी ऐकत असत…

Bollywood: अधुरी प्रेम कहाणी...! ह्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता दिदी..!म्हणून केलं नाही लग्न..!

कोण होते महाराज राजसिंह?

महाराज राजसिंह यांचा जन्म 19 डिसेंबर 1935 रोडी डुंगरपूर या राजपुत राजघराण्यात झाला होता. ते डुंगरपूरचे महाराजा लक्ष्मण सिंह यांच्या तीन मुलांमध्ये सर्वात लहान होते. त्यांच्या तीन बहिणींपैकी एक बीकानेरच्या महाराणी होत्या. राजसिंह यांनी आपले शिक्षण इंदोर येथील डेली कॉलेजमधून केले होते. 12 सप्टेंबर 2009 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

जर हा विवाह संपन्न झाला असता तर आज लता मंगेशकर एका राज्याच्या राणी असत्या. मात्र लता दीदींच्या आयुष्यात काही तरी वेगळं घडणार होतं. जेव्हा पण लता दीदींना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं जातं तेव्हा त्यांनी कायम एकच उत्तर दिलं की, घरच्या जबाबदारीमुळे त्या लग्न करू शकल्या नाहीत.

या मुळे केलं नाही लग्न..!लता दीदी आणि राज यांनी लग्न केलं नाही. कारण राज यांच्या कुटुंबियांनी अगोदरच सांगितलं होतं की, ते कोणत्याही सामान्य मुलीशी लग्न करू शकत नाही. आणि महाराज राज यांनी देखील आपल्या कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला. पण हे दोघं एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

लता मंगेशकर यांनी कधीही शिक्षण घेतलं नाही. पण त्यांच्या आयुष्याने त्यांना बऱ्याचगोष्टी शिकवल्या. तसेच त्यांनी आपल्या भावंडांना आपल्या आई-वडिलांची कमी जाणवू दिली नाही. अगदी शेवटपर्यंत त्या आपल्या भावंडांशी एकनिष्ठ राहिल्या. आई-वडिलांना दिलेला शब्द त्यांनी पाळला.

Bollywood: अधुरी प्रेम कहाणी...! ह्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता दिदी..!म्हणून केलं नाही लग्न..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button