Bollywood

Bollywood:बॉलिवूड च्या शेहनशहा सोबत दिसणार बाहुबली..!पहा या चित्रपटात करणार एकत्र काम..

Bollywood:बॉलिवूड च्या शेहनशहा सोबत दिसणार बाहुबली..!पहा या चित्रपटात करणार एकत्र काम..

मुंबई चित्रपट सृष्टीतील सर्वात वयोवृद्ध पण सक्रिय अभिनेते आणि शहेनशहा अमिताभ बच्चन वयाच्या या टप्प्यावरही उत्साहाने कामात व्यस्त आहेत.अमिताभ बच्चन सिनेसृष्टीमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे.आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन लवकरच ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत दिसणार आहेत. प्रभास आणि अमिताभ या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शनिवारी सांगितले की, त्यांनी अभिनेता प्रभाससोबत सायन्स फिक्शनवर आधारित आगामी चित्रपटासाठी पहिला शॉट शूट केला आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रभास एक प्रतिभावान आणि नम्र कलाकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘महानती’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाचे नाव ‘प्रोजेक्ट के’

या नवीन चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून, त्याला ‘प्रोजेक्ट के’ असे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.

अमिताभ यांनी ट्विट करत म्हटलं, ‘पहिला दिवस, पहिला शॉट. ‘बाहुबली’ हा प्रभाससोबतचा पहिला चित्रपट आणि त्याच्या प्रतिभा आणि त्याच्या विलक्षण नम्रते भरवून गेलोय. मी त्याच्याकडून खूप काही शिकण्यास उत्सुक आहे.

तर दुसरीकडे, प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button