Bollywood

Bollywod: मेकअप करताना सारा अली खान च्या चेहऱ्याजवळ फुटला बल्ब..!

Bollywod: मेकअप करताना सारा अली खान च्या चेहऱ्याजवळ फुटला बल्ब..!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम करत आहे. अशा परिस्थितीत, बिझी शेड्यूलमध्ये आता सारा अली खानसोबत एक गंभीर अपघात घडला आहे. सारासोबतच्या या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरंतर मेकअपसोबतच आरशावर लावलेले मोठे बल्ब आणि हेवी लाईट्स यांचाही अभिनेत्रींच्या सौंदर्यात मोठा वाटा असतो. मेकअप रूममध्ये आरशाभोवती मोठे बल्ब लावले जातात, जेणेकरून कलाकारांचा मेकअप हाय डेफिनेशनमध्ये उठून दिसून येतो. पण, आता सारासाठी हेच बल्ब त्रासदायक ठरले आहेत.

सोशल मीडियावरुन समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सारा तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत आरामात मेकअप करताना दिसत आहे. अचानक तेव्हा त्यांच्यासमोर असलेल्या आरशाचा बल्ब फुटतो आणि स्फोट झाल्याचा आवाजही येतो. अशा परिस्थितीत सारा देखील खूप घाबरते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वजण सारा अली खानच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
या स्फोटानंतर सारा प्रचंड दचकली आणि धक्क्याने कॅमेराही खाली पडला. ही घटना रविवारी घडल्याचे सांगितले जात आहे, ज्याचा व्हिडीओ स्वतः सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

सारा नुकतीच धनुष आणि अक्षय कुमारसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकली होती. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही खूप आवडला आहे. सारा अली खान सध्या इंदूरमध्ये आहे, जिथे ती लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन स्टारर ‘लुका छुप्पी’चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button