बोदवड/जळगांव

बोदवड येथे लोक अदालत संपन्न.

बोदवड येथे लोक अदालत संपन्न.

सुरेश कोळी

बोदवड लोक अदालती मध्ये दिवाणी 94 व फौजदारी06 असे एकूण 99 खटले निकाली काढण्यात आले. एकूण वसुली 21 लाख 47 हजार 440 रुपये झाली.

बोदवड प्रतिनिधी दिनांक 14/ 12 /2018
आज बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय बोदवड येथे आज सकाळी दहा वाजता लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एस.डी. गरड कार्यक्रमाचे उद्घाटक अडवोकेट अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ हे उपस्थित होते. तर पंच म्हणून एडवोकेट के. एस.इंगळे ,एडवोकेट अमोल सिंग पाटील हे उपस्थित होते. तर वकील संघाचे ॲडव्होकेट डी.सी प्रजापति , ॲडव्होकेट वाय. डी. सिखवाल ,ॲडव्होकेट सी.के पाटील , एडवोकेट आयडी पाटील , ॲडव्होकेट मीनल अग्रवाल, अडवोकेट अमोल परदेसी,आडवोकेट सौ काटकर ,एडवोकेट लढे, एडवोकेट मंगळकर,हे उपस्थित होते.दाखल पूर्व अन्य दिवाणी दावे 93 फौजदारी खटले 2 , चेक धनादेश अनादर दावे 4 असे एकूण 99 केसेस निकाली काढण्यात आल्या तसेच अन्य दाखल पूर्व दिवाणी दावे ग्रामपंचायत विभाग दोन लाख 47 हजार 440 रुपये वसूल झाले तर धनादेश अनादर प्रकरणी चार दाव्यांमध्ये 18 लाख 50 हजार रुपये वसूल झाले तर बँक वसुली दाखल पूर्व दावे यामध्ये रक्कम रुपये पन्नास हजार अशाप्रकारे 21 लाख 47 हजार 440 रुपये वसूल करण्यात आला. दाखल खटल्यांमध्ये तडजोड करण्यासाठी पक्षकार, वकील मंडळी, महाराष्ट्र बँक मॅनेजर सुनील ठोसर, ,सेंट्रल बँक प्रतिनिधी स्वप्नील लोखंडे , तालुक्यातील ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर बोदवड व तालुक्‍यातील परिसरातील पक्षकार व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी
बोदवड तालुका वकील संघ, न्यायालय अधीक्षक जे.बी. पाटील व न्यायालयीन कर्मचारी वर्ग, यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button