Kagal

रक्तदान, सामाजिक कर्तव्य म्हणून केले आहे डॉ अभिजीत शिंदे

रक्तदान, सामाजिक कर्तव्य म्हणून केले आहे
डॉ अभिजीत शिंदे
कागल : रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे आणि ते रक्तदान नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. असे प्रतिपादन कागल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित शिंदे यांनी केले. ते सिद्धनेर्ली येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रांजल फाउंडेशन, १९९३ दहावी बॅच, व दि सिद्धनेर्ली क्रेडिट को.ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी कागल पंचायत समितीच्या सभापती पुनम महाडिक म्हणाल्या, आपल्या गृपच्या व प्रांजल फाउंडेशनच्या वतीने प्रतीवर्षी आयोजित रक्तदानामुळे कित्येक जणांना जिवदान मिळत आहे , अजुनही रक्तदानासंबंधी जी काही जणांच्या मनात भीती आहे ती प्रत्यक्ष रक्तदान केल्यावरच जाऊ शकते. रक्तदानासारखं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दि सिद्धनेर्ली क्रेडिट को.ऑप सोसायटीच्या एटीएम सेवेचा शुभारंभ सभापती पुनम मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.
आज झालेल्या या रक्तदानामध्ये रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे.
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केलेल्या या रक्तदान मोहीमेत ८१ रक्तदात्यांनी वैभव लक्ष्मी ब्लड बॅकेकडे रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कागल पंचायत समितीच्या सभापती मान. पुनम मगदूम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजीत शिंदे, मेडीकल ऑफीसर डॉ गवळी आरोग्य सेवक अनिल जाधव, एम. पी. गोनुगडे, वैभव लक्ष्मी ब्लड बॅकेचे डॉ. रोषन आहीर, सिध्दनेर्ली ग्रामपंचायतीचे डे. सरपंच मान. मनोहर लोहार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,सिध्दनेर्ली ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्लीचे सर्व कर्मचारी, दि सिद्धनेर्ली क्रेडिट सोसायटीचे सर्व संचालक, कर्मचारी, प्रांजल फाउंडेशन पदाधिकारी, व 1993 बॅचचे सर्व सदस्य उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव लक्ष्मी ब्लड बॅक, सिद्धनेर्ली ग्रामपंचायत पदाधिकारी,कर्मचारी, इंजीनियर राहुल पाटील, रणजित पाटील, क्रेडिट सोसायटीचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button