Pandharpur

इसबावी येथे आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न..

इसबावी येथे आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न..

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर सोलापूर जिल्हा विधानपरिषदेचे आ. व पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त इसबावी येथिल नवशक्ती सामाजिक संघटना व पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश अधटराव मिञ परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 197 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या औचित्याने आमदार परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी रक्तदान हे किती महत्वकांशी शिबीर आहे याबाबत त्यांनी आपले सविस्तर मत व्यक्त केले व पुढ बोलत असताना त्यांनी इसबावी भागातील पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यामातुन मंजूर झालेली काही विकास कामे गेल्या दोन वर्षांपासून कोरोच्या पार्श्वभूमीवर रखडलेली आहेत तसेच वाखरी पालखी तळ ते मंदिरापर्यंतच्या चार पदरीकरण रस्त्याचे काम मंजूरीच्या अंतिम टप्प्यात असून या मार्गावर दोन्ही बाजूंना सर्विस रोड तसेच मार्केट यार्ड ते भोसले चौक असा ओव्हर ब्रिज असणार असून इसबावी येथिल दुध पंढरी व बुवांचे हाॅटेल या ठिकाणी रोडक्राॅस डक्ट असेल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button