Akkalkot

रक्तदान शिबीर आपल्या दारी.. ला अक्कलकोट मध्ये उदंड प्रतिसाद

रक्तदान शिबीर आपल्या दारी.. ला अक्कलकोट मध्ये उदंड प्रतिसाद

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट अक्कलकोट,दि.२२:-अक्कलकोट येथील Y4D फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम ६० जणांनी केले रक्तदान सध्या जगात, देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ज्याअर्थी नजीकच्या काळात रक्त/रक्तघटक यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअर्थी सद्यस्थितीत रक्तपेढ्या व रक्त साठवणूक केंद्र सुरु ठेवण्यासाठी युथ फॉर डेव्हलपमेंट सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाउन व सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळत “रक्तदान शिबीर आपल्या दारी” हि संकल्पना घेऊन कार्य करणार असल्याची माहिती युथ फॉर डेव्हलपमेंटचे जिल्हा प्रमुख प्रा. अनिकेत चनशेट्टी यांनी दिली.

रक्त संकलन शिबिराची सुरुवात आज अक्कलकोट शहर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. पोलिस स्टेशनच्या आवारात तब्बल ६० जणांनी डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वातानुकूलित रुग्णवाहिकेत लॉकडाउन व सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळत रक्तदान केल्याची माहिती Y4D अक्कलकोटचे समन्वयक देविदास गवंडी यांनी दिली. यावेळी हॅन्ड सॅनिटायझर व सर्व खुर्च्यांवर फवारणी अशा स्वच्छताविषयक सर्व गोष्टींची दक्षता घेण्यात आली होती.

अक्कलकोट पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी स्वतः रक्तदान करून सुरुवात केली व सर्वांना रक्तदान कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले व उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सर्व पोलीस सहकऱ्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला रक्तदान कार्यात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार सर्व रक्तदात्याना हॅन्ड सॅनिटायसर देण्यात आले.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सोलापूरचे जनसंपर्क अधिकारी सुनिल हरहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिश्चंद्र गलियाल, तंत्रज्ञ दीपा कुलकर्णी, रूपा लोंढे, मदतनीस पार्वती कोळी व राहुल म्हस्के यांनी तर युथ फॉर डेव्हलपमेंट चे स्वप्निल चनशेट्टी, प्रा. नितीन बानेगाव, देविदास गवंडी, अनंत क्षीरसागर, महेश भासगी व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button