Motha Waghoda

मोठा वाघोदा येथे रक्तदान शिबिर संपन्न कोरोना आपत्तीजनक परिस्थितीत 61 रक्तदात्यांनी केले रक्तदान तरुणांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर संपन्न….

मोठा वाघोदा येथे रक्तदान शिबिर संपन्न
कोरोना आपत्तीजनक परिस्थितीत 61 रक्तदात्यांनी केले रक्तदान तरुणांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर संपन्न….
मुबारक तडवी मोठा वाघोदा
मोठा वाघोदा : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे आज रक्तदान शिबीर संपन्न झाले. त्यात 50 तरुण रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना व्हायरस च्या प्रभावामुळे रक्ताचा तुटवड्यावर मात करण्यासाठी
मोठा वाघोद्यातील तरुणांच्या माध्यमातून मोठा वाघोदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते।रक्तदान हे 4 मे मंगळवार 2021 रोजी जागृती ग्रामीण पतसंस्था सभागृह येथे सकाळी 9 वाजेपासुन ते 1 वाजेपर्यत झाले. प्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन गावातील उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी व प्रगतीशील शेतकरी राहुल पाटील. राहुल महाजन यांनी केले त्यानंतर रक्तदानाला सुरुवात करण्यात आली.या शिबिराचे आयोजन युवा गुर्जर महासभा.माणुसकी ग्रुप समुह.श्री कृष्ण सांस्कृतिक गोफ मंडळ. जागृती युवक मंडळ .पीक संरक्षण सोसायटी यांच्या तर्फे करण्यात आले होते.शिबीराला विशेष सहकार्य स्वामी फार्मा ग्रामपंचायत कार्यालय .प्रगती एक्वा वॉटर.रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांचे लाभले.त्यावेळी
योगेश पाटील. रमाकांत महाजन.कमलाकर माळी.गोकुळ चौधरी.आशिष पाटील. गुरुदत्त पाटिल ; ऋषी महाजन; राहुल पाटील ; विशाल पाटील व अन्य सहकारी हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button