Nashik

बी के कावळे शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित

बी के कावळे शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित

सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे निश्चयाचा महामेरू आणि रयतेचे तारणहार होते त्यांनी रयतेच्या सुखदुःखात आपले सुखदुःख मांडले असे उद्गार राजगुरुनगर पुणे येथील शिवव्याख्याते संपतराव गारगोटे यांनी कादवा कारखाना येथे शिवछत्रपती एक आदर्श राजा या विषयावर व्याख्यान देताना बी के कावळे विद्यालय यामध्ये व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बीके शेवाळे हे होते विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य शेवाळे सर यांनी केला प्रास्ताविक श्री सुरेश सरोदे यांनी केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर विविध प्रकारचे दाखले देत इतिहास अभ्यासक संपतराव गारगोटे यांनी शिवाजी महाराज हे आदर्श न्याय राजा होते त्यांनी त्यांच्या जीवनात प्रजेला आपल्या कोणाकडूनही त्रास होणार नाही याची काळजी घेतली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे आभार पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव यांनी मानले विद्यालयाच्या वतीने दिंडोरी येथील शहीद झालेले जवान प्रसाद शिरसागर यांच्या प्रती आदरांजली व्यक्त करीत दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अभिवादन केले कार्यक्रमासाठी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाच्या प्रवेशद्वारी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणारे खडू नी चितारलेल चित्र चित्रकार श्री सारंग घोलप यांनी काढलेली सर्वांच्या नजरा वेधून घेत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button