Chandwad

चांदवड तालुक्यातील वीजेच्या व शेतीच्या समस्यांबाबत भाजपचे 27 डिसेंबरला ठिय्या आंदोलन.

चांदवड तालुक्यातील वीजेच्या व शेतीच्या समस्यांबाबत भाजपचे 27 डिसेंबरला ठिय्या आंदोलन.

उदय वायकोळे चांदवड

सध्या चांदवड तालुक्यातील विजेची समस्या , शेतीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात जटील होत चालले असुन , सध्याचे असलेले महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे . सक्तीची विज तोडणी , नादुरूस्त झालेल्या रोहित्र ( ट्रान्सफार्मर ) २४ तासाच्या आत न देणे, विजबिलाची वसुली सक्तीची करून विज पुरवठा खंडीत करीत आहे तसेच शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसाची १२ तास लाईट मिळाली पाहिजे व जाणुन बूजन शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावनांशी खेळ खेळण्याचा प्रयत्न करीत आहे . तसेच मागील काळात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करणे व केलेल्या पंचनाम्यांची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी . असे अनेक जटील प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आव्हानात्मक आहे . तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५०,००० रू . भरपाई देण्यात यावी . पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांची सरसकट भरपाई तात्काळ मिळावी . तसेच चांदवड शहरात व्यापारी वर्ग आर्थिक दृष्टया त्रस्त असतांना विज वितरण कंपनीच्या वतीने वीज तोडणी करून त्यांचे मानसिक संतुलन ढासळण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच दररोज विजेच्या लंपडावामुळे देखील इलेक्ट्रॉनिक वस्तु देखील नादुरूस्त होऊन त्यांना आर्थिक भुर्देड सहन करावा लागत आहे . या सर्व परिस्थित विज वितरण कंपनी जबाबदार आहे तरी या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चांदवड येथे शेतीवाहनासह शेतकरी आंदोलन सोमवार दि . २७ / १२ / २०२१ रोजी सकाळी ११.०० वा . मुंबई – आग्रा हायवे ( चौफुली ) चांदवड येथे समस्यां संदर्भात केंद्रीय मंत्री मा . ना . डॉ . भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार . डॉ . राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी चांदवड तालुका यांच्या वतीने ठिय्या आंदोनल करण्यात येणार आहे . तरी चांदवड तालुक्यातील शेतकरी व व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित रहावे असे आवाहन चांदवड – देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ . राहुल आहेर यांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button