Chalisgaon

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी बसविले नुराणी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक..

हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण…

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी बसविले नुराणी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक..

ईदच्या दिवशी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते पेव्हर ब्लॉक लोकार्पण, रेल्वे पुलाखालील रस्त्याची देखील केली पाहणी

चाळीसगाव – तालुक्यातील हिरापूर येथे मुस्लिम समाजाची मोठी वस्ती असून गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू – मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत. मुस्लिम समाज बांधवांचे गावाबाहेर नुराणी मशीद तेथे त्यांची नियमित प्रार्थना होत असते. मात्र ईद असो व इतर कार्यक्रम असो मशीद बाहेरील परिसरात बसण्यासाठी जागा नसल्याने सदर मशिदीच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत अशी मुस्लिम समाजाची अनेक दिवसांपासून मागणी होती. सदर बाब भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ याकामी वैयक्तिक १ लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले
व आज ईदच्या दिवशी नुराणी मशीद आवारात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने बसविलेल्या पेव्हर ब्लॉक चे उदघाटन आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, हिरापूर गावाचे माजी प्र.सरपंच संता पेहलवान, नितिन माळे,अनिल कापसे, राम पाटील व गावातील हिंदू मुस्लिम ग्रामस्थ उपस्थित होते
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मनोगतात आमदार मंगेशदादांनी सांगितले की हिरापूर येथे नुराणी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून हिंदू मुस्लिम एकतेचे हे आदर्श उदाहरण आहे. कुठल्याही गावाच्या विकासासाठी शांतता व सौहार्द महत्वाचे असते, हिरापूर गाव पुढील काळात देखील ही परंपरा कायम ठेवील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिरापूर गावातून मुख्य रस्त्याकडे व नुराणी मशिदी कडे येणारा रस्ता हा मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनखालील बोगद्यातून जात असल्याने त्याठिकाणी साचलेल्या डबक्याने अंगावर चिखल उडणे, छोटे मोठे अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. सदर बोगद्याची पाहणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी करून मी वैयक्तिक लक्ष घालून सदर काम मार्गी लावेल असे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button