Nashik

नगर पंचायत नगर अध्यक्ष निवडणुकीत भाजप नगर सेवक तटस्थ राहणार

नगर पंचायत नगर अध्यक्ष निवडणुकीत भाजप नगर सेवक तटस्थ राहणार

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी नगर पंचायत नगर अध्यक्ष निवडणुकीत भाजप नगर सेवक तटस्थ राहणार
असल्याची माहिती गटनेत्या सौ. अरुणा रणजित देशमुख यांनी दिली.
दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत दिंडोरीकरांनी मा आ रामदासजी चारोस्कर गटाच्या 8 जागा निवडून देऊन येथे राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात कौल दिला होता त्या जनमताचा आदर राखून भाजप नगरसेवकांनी चारोस्कर गटासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली होती.त्याप्रमाणे भाजप च्या नगरसेवकांनी चारोस्कर गटाला आपला निर्णय मत कळवले होते, परंतु मा आ चारोस्कर गटाच्या सर्व अटी शर्ती मानून सुद्धा कुठे तरी काही वेगळे घडले चारोस्कर गट आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्याचे चारोस्कर गटाकडून समजले, त्यामुळे भाजप चे चार ही नगरसेवक पुढील कार्यकाळात सक्षम पने विरोधी पक्षाची भूमिका घेत जनतेच्या हितासाठी बजावण्यास तयार आहे,त्यानुसार भाजपने जनमताचा आदर राखत नगर पंचाय तीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत तटस्थ भूमिका घेनार असून यापुढे जनतेच्या प्रश्नावर लढत राहूअसे गटनेत्या अरुणा रणजित देशमुख म्हणाल्या आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button