Kuhi

भाजप ब्राम्हणांचा तर राष्ट्रवादी बहुजनांचा पक्ष : ना.अनिल देशमुख

भाजप ब्राम्हणांचा तर राष्ट्रवादी बहुजनांचा पक्ष : ना.अनिल देशमुख

भागेश्वरला मी घडयाळ दीले,तुम्ही जील्हा परीषदेत पाठवा

तालुका वार्ताहर/कुही दिलीप चव्हाण
भाजप बहुजनांच्या नेतृत्वाचा द्वेष करीत आहे.त्यांचे नेतृत्व त्यांना जिव्हारी बोचत आहे. घोषणांच्या केवळ पोकळ वल्गना करणे व बहुजनांचे पंख छाटणे एवढेच काम गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने केले आहे.तेव्हा मतदार बंधू-भगिनींनो सावध रहा अशा ढोंगी,लबाड पक्षाला आम्ही राज्यात सत्तेपासून दूर ठेवलेच आहे.आता आपले मिनी मंत्रालय असलेली जि.प. व प.स.ची सत्ता त्यांच्यापासून दूर ठेवा,असे आवाहन नववर्षाच्या शुभारंभी मांढळ येथे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख यांनी केले.

.मनीषा भागेश्वर फेंडर यांच्या घड्याळ चिन्हावर व त्यांच्या सोबत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या मांढळ व तारणा प.स.च्या अनुक्रमे सौ.मंदा मनिराम डहारे,व संदीप श्रीराम खानोरकर यांच्या पंजा चिन्हासमोरील बटन दाबून पंचड मताधिक्याने विजयी कराल.अशी आपणांस विनंती करतो.
लीलाधर धनविजय,आशीष आवळे,कैलास हुडमे,
रा.कॉ.महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ.अर्चनाताई हरडे, उमरेड विधानसभा प्रमुख जीवनलाल डोंगरे,विनोद हरडे,संगिता निरगुडकर,डॉ.भाऊराव डोळस गोठणगाचे सरपंच रेखा सोनवणे,मांढळ ग्रामपंचायतचे राष्ट्रवादीचे गटनेता आशीष आवळे,सेवादल जील्हाध्यक्ष पुंडलीक राऊत आदी अनेक जण उपस्थित होते. संचालन वेळगावचे सरपंच जितेंद्र गोंडाने यांनी तर आभार रामजी दुधपचारे यांनी केले.सभेला हजारो नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button