Amalner

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचनप्रेरणा दिवस साजरा..

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचनप्रेरणा दिवस
साजरा..

अमळनेर : पू साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती
वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आला.
अगोदर वाचनालयाचे वाचन प्रेमी रियाजखान पठाण यांच्या हस्ते डाँ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन यांनी केले.
वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन म्हणाले की डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य तमाम भारतीयांना प्रेरणादायी आहे त्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचे विचार देशाला महासत्ता बनतील असे त्यांनी सांगितले
यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर अध्यक्ष दिलीप सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर ,चिटणीस प्रकाशजी वाघ ,जेष्ट संचालक भीमराव जाधव , ईश्वर महाजन व ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व वाचनालयाचे
कर्मचारी वर्ग व वाचक वर्ग उपस्थित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button